सोन्याची बॉटल.. त्यात हिऱ्याच्या पाण्यापासून बनवलेली वोडका, जगातील सर्वात महागडी मद्यं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 15:29 IST
1 / 6मद्य तयार करणाऱ्या कंपन्या काय नवं करतील याचा नेम नाही. कंपन्या अनेकदा श्रीमंतांच्या गरजांचीही काळजी घेताना दिसतात. अनेकदा लोक यासाठी हवी तितकी रक्कमही देताना दिसतात. अनेक महागड्या दारूच्या बॉटल्स जगभरात उपलब्ध आहेत. लोकांना आपल्या कलेक्शनमध्ये या ठेवण्याचीही आवड असते. जाणून घेऊया अशाच काही मद्याबाबत.2 / 61926 Macallan Fine and Rare Collection ही जगातील सर्वात महागड्या व्हिस्कींपैकी एक आहे. याच्या केवळ 40 बाटल्या तयार करण्यात आल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, 1987 मध्ये न्यूयॉर्कमध्ये 5 हजार पौंडमध्ये त्याचा लिलाव झाला होता. ही व्हिस्की जगातील सर्वात महाग आर्टवर्कचा लिलाव करणारी कंपनी सूडबाईजच्या वेबसाइटवर देखील सूचीबद्ध आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2019 मध्ये एका लिलावात ते 1452000 पौंड म्हणजेच सुमारे 13 कोटी 78 लाख रुपयांना विकले गेले.3 / 6Henri IV Dudognon Heritage Cognac ही जगातील दुर्मिळ आणि महागड्या मद्यांपैकी एक मानले जाते. कॉग्नाक ही एक प्रकारची ब्रँडी आहे, तिची बाटली 24 कॅरेट सोने, प्लॅटिनम इत्यादींनी सजलेली आहे आणि त्यावर 6500 कट हिरे जोडलेले आहेत. 100 वर्षांहून अधिक काळ बॅरलमध्ये ठेवून ते तयार केले गेले आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये, त्याच्या 1000 मिली बाटलीची किंमत अंदाजे 2 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 16 कोटी रुपये आहे.4 / 6Tequila Ley 295 Diamante ही टकीलाची जगातील सर्वात महागडी बाटली आहे. हे एक मेक्सिकन मद्य आहे जी ब्लू ऍगेव्ह वनस्पतीपासून बनविली जाते. याची बाटली तयार करण्यासाठी 2 किलो प्लॅटिनम आणि 4 हजारांहून अधिक पांढरे हिरे वापरण्यात आले आहेत. असे म्हणतात की हिऱ्यांमुळे टकीलाचा फ्लेव्हर चांगला येतो. अहवालानुसार, त्याची किंमत अंदाजे 3.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 28 कोटी 30 लाख रुपये इतकी होती.5 / 6Billionaire Vodka हा जगातील सर्वात महागडा वोडका मानली जाते. मागणीनुसारच ते तयार केल्याचे सांगितले जाते. ते तयार करण्यासाठी सीक्रेट रशियन रेसिपी वापरली जाते. हे अगदी कमी प्रमाणात तयार केले जाते. ते बनवण्यासाठी स्पेशल ट्रिपल डिस्टिल्ड वॉटर वापरण्यात आल्याचं सांगितलं जातं. त्याचबरोबर हे पाणी जमिनीतील हिऱ्यांमधून जात असल्याचा दावा केला जात आहे. त्याची किंमत अंदाजे $3.7 दशलक्ष म्हणजेच जवळपास 30 कोटी रुपये आहे.6 / 6Isabella’s Islay व्हिस्कीची बाटली तयार करण्यासाठी व्हाईट गोल्ड, 8500 हिरे वापरण्यात आले आहेत. याशिवाय त्यावर 300 नीलमही जडले आहेत. त्याची किंमत अंदाजे $ 6.2 दशलक्ष म्हणजेच 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.