सभागृहात टॉपलेस तरूणीचा फोटो बघताना आढळला खासदार, म्हणे - 'तिला मदत करत होतो'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 16:56 IST
1 / 8कोणत्याही देशात लोकांकडून निवडून गेलेले प्रतिनिधी हे देशाचा कारभार चालवण्यात महत्वाची भूमिका बजावत असतात. सभागृह एक असं ठिकाण आहे जिथे लोकप्रतिनिधी चर्चा करून देशाच्या हिताचे निर्णय घेतात. पण जर हे प्रतिनिधी तिथे जाऊन मजा मारत असतील तर देशाचं काय होईल हे स्पष्ट आहे. थायलॅंडमधील एक नेता सभागृहात मोबाइलवर टॉपलेस तरूणीचा फोटो बघताना आढळून आला. तिथे उपस्थित असलेल्या एका रिपोर्टरने त्याचे फोटो काढले आणि झूम करून पाहिले तर ही बाब समोर आली. हे फोटो आता व्हायरल झाले आहेत.2 / 8१७ सप्टेंबरची ही घटना आहे. बॅंकॉकच्या सभागृहात हा प्रकार घडला. येथील खासदार रोननाथप अनुवतला सभागृहात पॉर्न बघताना पकडण्यात आलं.3 / 8१७ सप्टेंबरला सभागृहात देशाच्या बजेटबाबत चर्चा सुरू होती. सगळेच या चर्चेकडे लक्ष देत होते. पण रोननाथप हा त्यांच्या मोबाइलमध्ये बिझी होता.4 / 8यादरम्यान गॅलरीत बसलेल्या एका रिपोर्टरची नजर खासदारावर गेली. त्याने त्याचे फोटो काढले. जेव्हा त्याने झूम करून पाहिले तर तो हैराण झाला.5 / 8 खासदार आपल्या मोबाइलमध्ये एका टॉपलेस तरूणीचे फोटो बघत होता. फोटो झूम करून बघत तो एन्जॉय करत होता.6 / 8जेव्हा हे फोटो रिपोर्टरने सर्वांसमोर दाखवले. तर खासदाराने उडवाउडवीची उत्तरे देत होता. खासदार म्हणाला की, महिलेला मदतीची गरज होती. त्यामुळे ते फोटो बघत होता.7 / 8खासदाराने मीडियाला सांगितले की, जेव्हा त्याला हा फोटो आला तेव्हा त्याला वाटले की, ही तरूणी अडचणीत तर नसेल ना. त्यामुळे तो फोटोचा बॅकग्राऊंड झूम करून बघत होता.8 / 8पण नंतर त्याला जाणीव झाली की, तरूणी फोटोच्या बदल्यात पैसे मागत आहे. तेव्हा त्याने फोटो डिलीट केलेत. सभागृहाच्या अध्यक्षांनी हे पर्सनल मॅटर असल्याचं म्हटलं. ते म्हणाले क, सभागृहात फोन चेक करण्यावर बंदी नाही. सोबत याबाबत काही गाइडलाईन नाही की, लोकांनी काय बघावं आणि काय बघू नये. त्यामुळे खासदाराला शिक्षा दिली जाऊ शकत नाही.