शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आश्चर्य! 'या' व्यक्तीचं नशीब असं बदललं की एका रात्रीत ३८१ कोटींचा झाला मालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 14:34 IST

1 / 5
एका व्यक्तीचं नशीब असं बदललं की, अचानक तो ३८१ कोटींचा मालक झाला. या व्यक्तीला ब्रिटनमधील नॅशनल लॉटरी लागली आहे. या विजयामुळे त्याने अनेक सेलिब्रिटींना मागे टाकलं आहे. ब्रिटन लॉटरी नियमानुसार विजेता आपलं नावं गुपित ठेऊ शकतो.
2 / 5
ब्रिटन नॅशनल लॉटरीमध्ये सर्वाधिक रक्कम जिंकण्याचा रेकॉर्ड १५८५ कोटी रुपये आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये एका व्यक्तीने ब्रिटनमध्ये नॅशनल लॉटरी जिंकली होती. हा विजेता कोट्याधीश झाला असून त्याच्या तिकीटीचा नंबर VRTL46314 असा आहे.
3 / 5
काही आठवड्यापूर्वी ब्रिटनमध्ये राहणारे कपल स्टीव थॉम्पसन आणि लंका यांनी ९७९ कोटी रुपये जिंकले होते. ब्रिटन नॅशनल लॉटरी वारंवार वेगवेगळ्या स्कीम लॉन्च करत असतं.
4 / 5
नॅशनल लॉटरीची लॉटरी सेट फॉर लाइफ स्कीमतंर्गत विजेत्याला ३० वर्ष प्रत्येक महिन्याला ८ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम दिली जाते. ऑगस्ट २०१९ मध्ये एका व्यक्तीला ही रक्कम मिळाली.
5 / 5
लॉटरी सेट फॉर लाइफ स्कीम युवा डीन वीमेस यांनी जिंकली होती.