लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
1 / 8भारतात अशी काही ठिकाणं आहेत की तेथील रहस्यमय गोष्टींमागचं सत्य आजवर समोर आलेलं नाही. यात गुहा, किल्ले आणि इतर ठिकाणांचा समावेश आहे. 2 / 8भारतातील मेघालय येथील अशाच एका ठिकाणाची जोरदार चर्चा आहे. येथील एक गुहा रहस्यमय गोष्टींसाठी ओळखली जाते. 3 / 8मेघालय येथील क्रेम पुरी नावाच्या गुहेबाबत अनेक रहस्यमय कहाण्या सांगितल्या जातात. २०१६ साली शास्त्रज्ञांच्या एका टीमनं या गुहेचा शोध लावला होता. 4 / 8वालुकामय दगडांची ही जगातील सर्वाधिक लांबीची गुहा म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. 5 / 8अतिशय भयावह दिसणाऱ्या या गुहेचं प्रवेशद्वार देखील उंच आणि तीक्ष्ण खडकांचं असून अंगावर काटा आणणारं आहे. 6 / 8सर्वाधिक पाऊस होण्यासाठी लोकप्रिय असलेल्या मासिनरामच्या हिरव्यागार पर्वतरांगांमध्ये ही गुहा तब्बल १३ किलोमीटर इतकी पसरली आहे. गुहेत तापमान १६ ते १७ डिग्री सेल्सियस इतकं असतं. 7 / 8व्हेनेझुएला येथील क्यूवा डेल समन नावाच्या गुहेची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. या गुहेची लांबी ६ हजार मीटरपेक्षाही अधिक आहे. पण क्रेम पुरी गुहा क्यूवा डेल समन गुहेपेक्षाही लांब असल्याचं सिद्ध झालं आहे. 8 / 8गुहेचा शोध घेतलेल्या मेघालय अॅडवेंचर असोसिएशननं या गुहेचं नाव क्रेम पुरी असं ठेवलं आहे.