१५०० वर्षाआधी जमिनीखाली दडलेलं गुपित उघड, राजाच्या कबरेत जे दिसलं ते पाहून सगळेच हैराण!
By अमित इंगोले | Updated: September 28, 2020 11:00 IST
1 / 9शौकी बडी चीज होती हैं....हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेलच. जुन्या काळात राजे-महाराजे याबाबत फारच पुढे होते. त्यांचे शौक पाहून जगभरातील लोक हैराण व्हायचे. यासाठी ते पाण्यासारखा पैसा खर्च करत होते. त्यांच्याकडे प्रत्येक प्रकारची सुविधा असायची. या लोकांचे महाल, त्यांच्या गाड्यांचं कलेक्शन पाहण्यासारखं राहत होतं. अनेक महाराजांचे हरम असायचे. यात त्यांच्या सेवेसाठी अनेक महिला राहत होत्या. पण नुकतीच जर्मनीतील Brücken-Hackpfüffel मध्ये संशोधकांना एका राजाची कबर मिळाली. ही कबर पाहून सगळेच हैराण झाले. या राजाच्या बॉडीसोबतच तिथेच सहा महिलांच्याही बॉडी होत्या. असे सांगितले जात आहे की, १५०० वर्षाआधी राजासोबत या महिलांनाही दफन करण्यात आलं होतं. पोल्ट्री फार्मसाठी खोदकाम करताना ही कबर नजरेस पडली.2 / 9या राजाच्या बॉडीच्या आजूबाजूला सहा महिलांच्या बॉडी आढळून आल्या. असा अंदाज लावला जात आहे की, या त्याच्या खास सेविका होत्या. इतकेच नाही तर राजाच्या बॉडीजवळ घोडे आणि कुत्र्यांसहीत ११ जनावरांचे अवशेष मिळाले आहेत. 3 / 9राजाची मुख्य कबर फार सावधतेने काढण्यात आली. ही कबर इतिहास जाणून घेण्यासाठी महत्वाची मानली जात आहे. सोबतच ही कबर आता प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहे.4 / 9या कबरेत सापडलेला हा काचेचा कटोराही प्रयोगशाळेत पाठवण्यात आलाय. सोबत इतरही काही अमूल्य वस्तू सापडल्या आहेत.5 / 9या कबरेत सापडलेली काही शस्त्रेही प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहे. 6 / 9१५०० वर्षांपासून जमिनीखाली असलेल्या वस्तू जशाच्या तशा असल्याचे पाहून संशोधक हैराण झाले. 7 / 9१५०० वर्षांपासून जमिनीखाली असलेल्या वस्तू जशाच्या तशा असल्याचे पाहून संशोधक हैराण झाले. 8 / 9१५०० वर्षांपासून जमिनीखाली असलेल्या वस्तू जशाच्या तशा असल्याचे पाहून संशोधक हैराण झाले. 9 / 9१५०० वर्षांपासून जमिनीखाली असलेल्या वस्तू जशाच्या तशा असल्याचे पाहून संशोधक हैराण झाले.