डॉक्टरी सोडून केली IPS ची तयारी, व्हॅलेंटाइन डे ला ऑफिसमधेच केलं होतं लव्ह मॅरेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 15:31 IST
1 / 7IPS Officer Navjot Simi: आज आम्ही तुम्हाला एका IPS अधिकाऱ्याबाबत सांगणार आहोत, ज्यांनी IPS बनण्यासाठी डॉक्टरी सोडली. या आयपीएस अधिकाऱ्याचं नाव आहे नवज्योत सिमी (IPS Navjot Simi). ज्या २०१७ बॅचच्या बिहार कॅडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. नवज्योत सिमी यांना आपल्या दुसऱ्या प्रयत्नात सिव्हिल परीत्रेत यश मिळालं होतं. त्यानंतर त्या आयपीएस बनल्या.2 / 7नवज्योत सिमी यांचा जन्म पंजाबजच्या गुरदासपूमध्ये २१ डिसेंबर १९८७ ला झाला होता. त्यांचं सुरूवातीचं शिक्षण पंजाबच्या पाखोवालच्या मॉडल पब्लिक स्कूलमध्ये झालं होतं.3 / 7नवज्योत सिमी बालपणापासून आयपीएस अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं. आधी त्या डॉक्टर होत्या आणि त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली होती. पण नंतर डॉक्टरी सोडून त्या UPSC ची परीक्षा देण्यासाठी दिल्लीला येऊन तयारी केली. मग २०१६ मध्ये त्याने पहिल्यांदाच सिव्हिल परीक्षा पास केली होती. पण मुलाखतीत पुढे जाऊ शकल्या नव्हत्या.4 / 7नवज्योत सिमी जेव्हा पहिल्या प्रयत्नात अपयशी झाल्या तर दुसऱ्यावेळी त्यांनी खूप मेहनत घेतली. यानंतर २०१७ मध्ये ७३५वी रॅकिंग मिळवत IPS अधिकारी बनल्या.5 / 7आयपीएस अधिकार बनण्याआधी त्या डॉक्टर होत्या. २०१० मध्ये लुधियानाच्या बाबा जसवंत सिंह डेंटल कॉलेज, हॉस्पिटल आणि अनुसंधान संस्थेतून BDS ची डिग्री घेऊन त्या डॉक्टर बनल्या होत्या.6 / 7UPSC परीक्षेत पास झाल्यावर नवज्योत सिमी यांना बिहार कॅडर मिळाला होता. नवज्योत सिमी सोशल मीडियावरही बऱ्याच अॅक्टिव असतात. त्या इन्स्टाग्रामवर नेहमीच आपले फोटो शेअर करत असतात.7 / 7नवज्योत सिमी यांनी २०२० सालातील व्हॅलेंटाइन डे ला IAS अधिकारी तुषार सिंगला यांच्यासोबत ऑफिसमध्येच लव्ह मॅरेज केलं होतं. तुषार सिंगला हे पश्चिम बंगा कॅडरचे २०१५ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. व्हॅलेटाईन डे ला त्यांनी पटन्याहून हावडाला जाऊन ऑफिसमध्ये लग्न केलं हों.