रेल्वेच्या डब्यांवर का असतात पांढऱ्या, पिवळ्या आणि ग्रे पट्ट्या, जाणून घ्या त्यामागील रंजक तथ्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 19:59 IST
1 / 9Indian Railways interesting Facts: भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. देशातील सर्वात विलक्षण दृश्ये आणि साहसी मार्गांचा अनुभव घेण्याचा हा सर्वोत्तम आणि तुलनेने स्वस्त मार्गांपैकी एक आहे. 2 / 9१६ एप्रिल १८५३ रोजी पहिली पॅसेंजर ट्रेन बोरी बंदर ते ठाणे दरम्यान ३४ किमी अंतरावर धावली. साहिब, सुलतान आणि सिंध नावाच्या तीन लोकोमोटिव्हद्वारे ती चालवण्यात आली होती आणि त्याला तेरा डबे होते. अर्थव्यवस्थेच्या आणि वाहतुकीच्या दृष्टीने, बाजारपेठा एकत्रित करण्यात आणि व्यापार वाढवण्यात रेल्वेने मोठी भूमिका बजावली.3 / 9आपण बरेचदा ट्रेनने प्रवास करतो पण तरीही त्याच्याशी संबंधित रंजक गोष्टींबद्दल आपल्याला माहिती नसते. भारतीय रेल्वेशी निगडीत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बहुतेक लोकांना माहित नाहीत. यापैकी एक म्हणजे ट्रेनच्या वेगवेगळ्या डब्यांवर वेगवेगळ्या रंगांच्या रेषा रंगवल्या जातात. काही वेळा वेगवेगळ्या डब्यांवर वेगवेगळ्या रंगांचा वापर केला जातो. परंतु त्यामागे काही मेसेजही असतो. जाणून घेऊया याबद्दल.4 / 9भारतीय रेल्वेद्वारे नेहमीच प्रवाशांसाठी सुलभ आणि आनंददायी अनुभव घेता येतो. गाड्यांवर बनवलेले विविध रंगाचे पट्टे हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे प्रवाशांना ते सहज ओळखता येते, पण ट्रेनच्या डब्यांवरच्या या पिवळ्या किंवा लाल पट्ट्यांचा खरा अर्थ आपल्यापैकी अनेकांना माहित नसेल.5 / 9निळ्या आणि लाल कोटवर पिवळ्या पट्ट्या - ट्रेनच्या निळ्या आणि लाल डब्यांवर पिवळे पट्टे रंगवलेले असतात, जे असे दर्शवतात की हे डबे दिव्यांग प्रवाशांसाठी डिझाइन केलेले आहेत. हे त्या प्रवाश्यांसाठी देखील आहेत जे आजारी आहेत.6 / 9निळ्या कोचवर सफेट पट्टी - विशिष्ट ट्रेनचे अनारक्षित द्वितीय श्रेणीचे डबे दर्शविण्यासाठी निळ्या रंगाच्या रेल्वे डब्यांवर पांढरे पट्टे रंगवले जातात. या पट्ट्यांच्या मदतीने प्रवाशांना सामान्य डबे सहज ओळखता येतात.7 / 9हिरव्या पट्ट्यांसह ग्रे कोच हिरव्या पट्ट्यांसह ग्रे कोच हे डबे महिलांसाठी राखीव असल्याचे सूचित करतात.8 / 9ग्रे कोचवर लाल पट्टी या क्रमातील ग्रे डब्यांवर लाल पट्टे दाखवतात की ते EMU/MEMU ट्रेनमधील प्रथम श्रेणीचे डबे आहेत.9 / 9राजधानी एक्स्प्रेस नवी दिल्लीला विविध राज्यांच्या राजधानींशी जोडण्यासाठी भारतीय रेल्वेद्वारे एक्सप्रेस गाड्यांची मालिका चालवली जाते. त्या पूर्णपणे वातानुकूलित गाड्या आहेत ज्यांचे LHB स्लीपर कोच डीफॉल्ट रुपाने लाल रंगवलेले असतात, ज्याला राजधानी लिव्हरेड म्हणतात. पूर्वी फक्त राजधानी एक्सप्रेस गाड्यांमध्ये लाल रंग वापरला जात होता, आता हे डबे इतर एक्सप्रेस गाड्यांमध्ये देखील वापरले जातात.