रेल्वेच्या कोचमधील एसीची क्षमता किती टनाची असते? वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 16:07 IST
1 / 8Indian Railways: उन्हाळ्यात उकाड्यापासून वाचण्यासाठी जास्तीत जास्त लोक रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करतात. गारेगार एसी कोचमध्ये बाहेरच्या उन्हाची जराही झळ लागत नाही. पण रेल्वेच्या एसी कोचमधील एसी किती टनाचा असतो? याचं उत्तर अनेकांना माहीत नसतं. 2 / 8रेल्वे कोचमध्ये एसीची क्षमता कोचच्या प्रकारावरून आणि त्याच्या डिझाइनवर अवलंबून असते. रेल्वेमध्ये दोन मुख्य प्रकारचे कोच असतात, एक म्हणजे इंटीग्रल कोच फॅक्टरी आणि दुसरा म्हणजे लिंके हॉफमॅन बुश.3 / 8आयसीएफ कोच जुना आहे. तर एलएचबी कोच आधुनिक आणि जास्त स्पीड असलेल्या रेल्वेमध्ये वापरले जातात. आयसीएफ कोचच्या फर्स्ट एसी कोचमध्ये ६.७ टनचा एसी यूनिट वापरला जातो.4 / 8आयसीएफच्याच सेकंड एसी कोचमध्ये दोन यूनिट असतात आणि एका यूनिटची क्षमता ५.२ टनचा एसी असतो. त्याशिवाय थर्ड एसीमध्ये ७.७ टनाचे दोन यूनिट यूज केले जातात.5 / 8एलएचबी कोच जास्त पॉवरफुल असतो. प्रत्येक कोचमध्ये दोन ७ टनाचे एसी यूनिट असतात. म्हणजे या कोचमध्ये एकूण १४ टनाची एसीची क्षमता असते. 6 / 8रेल्वेमध्य एसी सिस्टमला जास्त तापमानाच्या दृष्टीनं डिझाइन केलं जातं. हे यूनिट विजेवर चालतं जे कोचच्या खाली लावलेल्या अल्टरनेटर किंवा डिझेल जनरेटरसोबत मिळते. आधुनिक एसी यूनिट प्रवाशांना २३ ते २५ डिग्री सेल्सिअस तापमानावर आराम देतं.7 / 8आधी रेल्वेमध्ये बर्फाच्या ब्लॉकनं थंडावा केला जात होता. हे १९३४ मधील फ्रंटिअर मेलमध्ये होतं. १९५६ मध्ये पहिल्यांदा पूर्णपणे एसी रेल्वे सुरू झाल्या. 8 / 8वंदे भारत पूर्ण एसी कोच रेल्वे आहे. प्रत्येक कोचमध्ये दोन रूफ-माउंटेड एसी यूनिट लावलं आहे. यातील प्रत्येकाची क्षमता ७ टनाची असते. याचा अर्थ एका कोचमध्ये एकूण १४ टन एसी क्षमता असते.