शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 19:43 IST

1 / 10
नेहमी एखाद्या संकटात आपल्याला मित्राची आठवण येते, कारण मित्रांवर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवत असतो. परंतु जर मित्रानेच दगा दिला तर मनाला खूप वेदना होतात. ज्याने दगा दिला, त्याचा बदला घ्यायचा की त्याच्याशी मैत्री केली म्हणून स्वत:लाच दोष द्यायचा हे कळत नाही.
2 / 10
चीनमध्ये राहणाऱ्या एका महिलेसोबत असाच काही प्रकार घडला, जिने तिच्या मैत्रिणीवर आरोप लावला आहे की, मागील ५ वर्ष ती तिच्या पतीसोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये होती आणि तिने महिलेला अंधारात ठेवले.
3 / 10
आता इतक्या जीवलग मैत्रिणीने आपल्याच नवऱ्यासोबत संबंध ठेवले, ५ वर्ष त्याची जराही भनक लागू दिली नाही. त्यामुळे या मैत्रिणीचा बदला घ्यायचा हे तिने डोक्यात पक्के ठरवले आणि त्यानंतर जे घडले ते अख्ख्या शहराने पाहिले.
4 / 10
या महिलेने तिच्या बेस्ट फ्रेंडबाबत असे काही लिहिले आणि त्याचे मोठेमोठे बॅनर शहरात छापले. SCMP रिपोर्टनुसार, चीनच्या हुनान प्रांतातील ही घटना आहे. इथल्या चांगशा शहरातील महिलेसोबत हा प्रकार घडला.
5 / 10
पत्नीने तिचा राग आणि मनाला झालेली वेदना दाखवण्यासाठी एका सोसायटीच्या गेटवर मोठे बॅनर आणि झेंडे लावले. या बॅनरमध्ये महिलेने तिच्या जीवलग मैत्रिणीच्या नावाचा उल्लेख केला आणि तिचे आभार मानले.
6 / 10
या बॅनरवर तिने लिहिले होते की, गेल्या ५ वर्षांपासून शी माझ्या पतीशी शारीरिक संबंध ठेवत होती.'शी' असं या महिलेचे आडनाव होते हे या बॅनरवर स्पष्टपणे लिहिले होते. ही महिला होंगशान समुदायातील एका सरकारी कार्यालयाच्या वित्त विभागात काम करते.
7 / 10
एका बॅनरवर लिहिले होते, शी ने तिच्या जिवलग मैत्रिणीच्या पतीशी प्रेमसंबंध ठेवले. ती १२ वर्षांपासून माझी सर्वात चांगली मैत्रीण राहिली आहे आणि गेल्या ५ वर्षांपासून माझ्या पतीशी शारीरिक संबंध ठेवत आहे असं म्हटलं.
8 / 10
त्याशिवाय ती ऑफिसच्या वेळेत माझ्या पतीसोबत हॉटेलमध्ये जायची असं दुसऱ्या बॅनरमध्ये दावा करण्यात आला होता. या बॅनरसोबत काही झेंडेही लावण्यात आले होते, जे एका कारवर फडकताना आढळले.
9 / 10
जेव्हा माध्यमांनी होंगशान समुदायाच्या पर्यटन विभागाशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी कबूल केले की त्यांच्याकडे शी नावाचा एक कर्मचारी आहे आणि या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
10 / 10
परंतु पतीने आणि मैत्रिणीने फसवलेल्या महिलेने हे बॅनर ज्याठिकाणी तिची जीवलग मैत्रिण राहते तिथे झळकावले की नाही याबाबत स्पष्टता नाही. मात्र काही काळानंतर बॅनर काढून टाकण्यात आले.
टॅग्स :husband and wifeपती- जोडीदार