शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

अबब! 24 मजल्यांच्या 'या' इमारतीसाठी ना वापरली विट ना सिमेंट; मग काय वापरलं? पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 12:47 IST

1 / 6
तुम्ही जगभरातील अनेक इमारतींबद्दल ऐकलं असेल. गगनचुंबी इमारतींचे आकर्षण सगळ्यांनाच असतं. या इमारती विटा, दगड, सिमेंट अशा इतर साहित्यांनी उभारलेल्या असतात. मात्र तुम्ही कधी ऐकलं आहे का एक इमारत संपूर्ण लाकडापासून बनविण्यात आली आहे.
2 / 6
चीनमध्ये एक इमारत लाकडांपासून बनविण्यात आली आहे. ही इमारत 24 मजल्यांची आहे. या इमारतीचे खांब कॉंक्रिटपासून बनविण्यात आले आहेत. या इमारतीची उंची 99.9 मीटर इतकी आहे.
3 / 6
लाकडापासून बनविण्यात आलेली ही इमारत कदाचित जगातील पहिलीच इमारत असेल. या इमारतीचे बांधकाम इकोफ्रेंडलीपद्धतीने केले आहे. ज्यात 150 पेक्षा अधिक खोल्या आहेत.
4 / 6
या इमारतीच्या भिंतीपासून ते छतापर्यंत सर्व बांधकाम लाकडाचे आहे. या मजबुतीसाठी देवदार या लाकडांचा वापर करण्यात आला आहे.
5 / 6
ही इमारत चीनच्या गुइझोई प्रांतातील यिंगशान शहरात बनविण्यात आली आहे. सध्या ही इमारत रिकामी आहे मात्र पर्यटक मोठ्या संख्येने ही इमारत पाहण्यासाठी गर्दी करतात. या इमारतीचं बांधकाम सुइ हैंग या आर्किटेक्टने केलं आहे.
6 / 6
सुइ हैंगच्या सांगण्यानुसार ही इमारत 3 वर्षांपूर्वी बनविण्यात आली आहे. मात्र या इमारतीचा आराखडा बनविण्यासाठी 1 वर्ष लागला आहे.
टॅग्स :chinaचीन