शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

खेळता खेळता मुलांनी मैदानात जमीन खोदली; एका घागरीतून ‘इतकी’ चांदीची नाणी बाहेर पडली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 12:50 IST

1 / 10
सध्या सगळीकडे लॉकडाऊन सुरु आहे, कोरोनामुळे लोकांना घरीच राहणं भाग पडत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक जण वेळ घालवण्यासाठी काहीतरी विरंगुळा शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
2 / 10
जर आपणास अचानक खूप खजिना सापडला तर ते आश्चर्यापेक्षा कमी नाही. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील औरैया येथील अचलदा पोलिस स्टेशन परिसरातील साजनपूर गावात घडली आहे.
3 / 10
याठिकाणी खेड्यातील मुले एका पडीक जमिनीवर क्रिकेट खेळत होती. मग खेळामध्ये मुलांनी मैदानाच्या एका ठिकाणी खोदले ज्यानंतर सर्वांचे होश उडाले.
4 / 10
मुलांनी खेळत खेळत जमीन खणली त्याठिकाणाहून एक लहानशी घागर बाहेर काढली. ज्यामधून ३० चांदीची नाणी बाहेर आली. ग्रामस्थांच्या माहितीवरून पोलिसांनी नाणी ताब्यात घेतली. औरैया उपजिल्हाधिकारी रशीद अली आणि सीओ मुकेश प्रताप सिंह यांनी घटनास्थळी भेट दिली
5 / 10
यानंतर प्रशासनाकडून ज्या ठिकाणी नाणी सापडली त्याच्या आसपास तपासणी केली आणि त्या ठिकाणी उत्खनन केले पण त्या जागेभोवती काहीच सापडले नाही.
6 / 10
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत, लहान मुले आपला वेळ घालवण्यासाठी नवीन मार्ग शोधत असतात. त्याचवेळी सोमवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.
7 / 10
तुरुकपूर आणि साजनपूर या गावादरम्यान रिकाम्या मैदानात मुले खेळत होती. त्याच मैदानावर इतर मुले देखील होती, जी जमीन खणत खेळत होती. जेव्हा मुले खेळात जमीन खणत होते तेव्हा जमिनीतून घागर बाहेर आली. हे पाहून मुलांना आश्चर्याचा धक्का बसला मुलांनी याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली.
8 / 10
मुलांच्या माहितीनंतर घागर पाहण्यासाठी गावातील लोक मैदानात पोहोचले, त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिस ठाण्यात देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी ग्राउंड वरून जमिनीतून काढलेली घागर पोलीस ठाण्यात आणली.
9 / 10
जेव्हा पोलिसांनी ही घागर उघडली त्यात तीस चांदीची नाणी सापडली, त्यापैकी २७ नाणी १८४० व्हिक्टोरिया काळातील असून ३ नाणी १८३५ मधील किंग विल्यम्स काळातील आहेत.
10 / 10
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घागरातून निघालेली ही सर्व चांदीची नाणी पुरातत्व विभागाकडे देण्यात येणार आहेत. अछल्दाचे पोलिस अधिकारी राजेश कुमार म्हणतात की, ही मुले रिकाम्या मैदानात खेळत होती. त्याच वेळी, काही मुलं खेळामध्ये जमिनीत खड्डा बनवत होते. तेव्हा लहान मुलांना घागरीमध्ये ३० नाणी सापडली आहेत. ही नाणी पुरातत्व विभागाचे आहेत.
टॅग्स :Silverचांदी