बाबा वेंगा यांची मोठी भविष्यवाणी...! पुढच्या ५० वर्षांत नेमकं काय घडणार? जे वाचून संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 14:46 IST
1 / 7बाबा वेंगा या आपल्या भाकितांसाठी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांची अनेक भाकितं आजवर खरी ठरली आहेत. उदाहरणादाखलच सांगाचे झाल्यास, चेरनोबिल अणु संकट. त्यांचे अधिकांश जीवन बल्गेरिया येथेच गेले. त्यांना 'बाल्कनचा नॅस्ट्रोडॅमस' म्हणूनही ओळखले जाते. 2 / 7त्यांच्या भाकितांपैकी एक म्हणजे २०७६ पर्यंत जागतिक स्तरावर पुन्हा एकदा साम्यवादाची एन्ट्री होईल. यामुळे संपूर्ण जगात कम्युनिस्ट राजवट येईल. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, ५०७९ मध्ये एका नैसर्गिक घटनेमुळे जगाचा अंत होईल, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली आहे.3 / 7२०७६ मध्ये नेमकं काय होणार? - बाबा वांगा यांच्या मते, २०७६ पर्यंत जागतिक राजकारणात प्रचंड मोठे बदल घडतील आणि जगभरात साम्यवाद आणि समाजवादाचा प्रभाव वाढेल. या काळात, जगातील अनेक प्रमुख अर्थव्यवस्थांमधील भांडवलशाही दूर होईल. समाजात आर्थिक समानता वाढेल आणि खाजगी मालमत्तेची संकल्पना कमकुवत होईल. जगातील सत्ता संतुलन बदलल्याने, नवे नेतृत्व आणि राजकीय व्यवस्था उदयास येतील.4 / 7खरे तर, सध्या भांडवलशाहीचे वर्चस्व आहे. मात्र, वाढती आर्थिक असमानता, गरिबी आणि भांडवलशाहीतील त्रुटींमुळे काही देश समाजवादाकडे झुकू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. 5 / 7चीन, क्युबा आणि उत्तर कोरिया सारख्या देशांमध्ये अजही साम्यवादी सरकारं आहेत. तर अनेक युरोपीय आणि लॅटिन अमेरिकन देश डाव्या विचारसरणीकडे झुकताना दिसत आहेत.6 / 7खरी ठरेल बाबा वेंगा यांची ही भविष्यवाणी? - भाकितांसंदर्भात बोलायचे झाल्यास, भाकितांवर अेक वेळा प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र, बाबा वेंगा यांचा विचार करता, त्यांची अनेक भाकिते खरी ठरल्याचा दावा केला जातो, जसे ९/११ चा दहशतवादी हल्ला आणि २००४ ची त्सुनामी. मात्र, त्यांचे इतर दावे अद्याप सिद्ध झालेले नाहीत. 7 / 7खरे तर २०७६ मध्ये जगतिक स्तरावर खरोखरच साम्यवादाचा उदय होणार की नाही, हे येणारा काळच ठरवेल. मात्र, जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.