कलाकाराच्या अप्रतिम कलाकृतीला सलाम; फुग्यांपासून साकारले हुबेहुब पक्षी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 15:55 IST
1 / 7सुंदर पक्षी नेहमीच आपलं लक्ष वेधून घेत असतात. मात्र रंगीबेरंगी फुग्याच्या मदतीने अगदी हुबेहुब पक्षी तयार केले जातात असं कोणी सांगितलं तर त्यावर सुरुवातीला विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. टी जेम्स कूक या आर्टिस्टने फुग्यांपासून सुंदर पक्षी तयार केले आहेत.2 / 7टी जेम्स कूक यांनी आपल्या लाडक्या भाचीसाठी फुग्यांपासून सुंदर पक्षी तयार करण्याची कला अवगत केली. कूक यांच्या कलेचं सर्वत्र कौतुक होत आहे. 3 / 7कूक यांच्या भाचीला पक्षी खूप जास्त आवडत असल्याने त्यानी विविध रंगाच्या फुग्यांपासून अनेक प्रजातीचे पक्षी तयार केले आहेत. 4 / 7क्वाटेटेक्स फुगाच्या मदतीने टी जेम्स कूक यांनी भाचीसाठी आकर्षक पक्षी तयार केले आहेत. 5 / 7नेहमी काहीतरी नवीन करण्याचा कूक यांचा मानस असून ते सातत्याने नवनवीन गोष्टी करत असतात. तसेच टी जेम्स कूक अप्रतिम पेंटींग काढतात. 6 / 7इन्स्टाग्रामवर कूक त्यांच्या कलेसाठी अत्यंत लोकप्रिय असून त्यांनी तयार केलेल्या पक्ष्यांचे काही खास फोटो शेअर केले आहेत. 7 / 7इन्स्टाग्रामवर कूक यांच्या फॉलोअर्सची संख्या ही अधिक आहे.