पॉर्न इंडस्ट्रीचं भयावह वेदनादायी सत्य, जे वाचून अंगावर काटा येईल....
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 12:55 IST
1 / 8कधी कधी जे दिसतं ते तसं नसतं. पॉर्न स्टार्सचं आयुष्यही असंच असतं. बऱ्याच लोकांना वाटतं की, पॉर्न स्टार्स मजा करतात आणि भरमसाठ पैसा कमवून आरामात आयुष्य जगतात. पण सत्य काही वेगळंच असतं.2 / 8फीमेल असो वा मेल. कदाचित क्वचितच कुणी असेल जो पॉर्न इंडस्ट्रीत आपल्या मनाने आलं असेल. जर कुणी आपल्या मनाने इथे कुणी आलंही असेल तर तिथे टिकणं फारच अवघड आहे. पॉर्न इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स आहेत ज्यांनी मोकळेपणाने आपल्या कामावर वक्तव्य केलं आणि जगाला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला. 3 / 8पॉर्न स्टार Aaron ने सांगितलं की, कॉलेजच्या लास्ट सेमिस्टरमध्ये तो los angeles ला शिफ्ट झाला होता. ट्यूशन फीस आणि घराचा खर्च चालवणं आणि पोट भरणंही Aaron साठी कठिण झालं होतं. यादरम्यान Grindr नावाच्या एका व्यक्तीसोबत त्याची भेट झाली. जो आधीच इंडस्ट्रीचा भाग होता.4 / 8बराच विचार केल्यानंतर Aaron इंडस्ट्रीचा भाग बनला, पण इथे आल्यावर त्याला इथे फसल्यासारखं वाटत होतं. Aaron ला हे करायचं नव्हतं. इच्छा नसताना काम करण्याचा परिणाम असा झाला की, Aaron थोड्या दिवसांनंतर Chlamydia नावाच्या आजाराने ग्रस्त झाला. 5 / 8Simon हा द सेक्स फॅक्टरचा एक्स स्पर्धकही राहिला आहे. पॉर्न इंडस्ट्रीचा भाग बनलेल्या Simon ने सांगितलं की, हे काम ड्रग्ससारखं आहे. ज्याने हळूहळू लोक डिप्रेशनमध्ये जातात. सायमनने सांगितलं की, पॉर्न एक सेल्फिश बिझनेस आहे. ज्यात चांगलं काम करण्यासाठी तुम्हाला फार लहान व्हावं लागतं. तो म्हणाला की, या इंडस्ट्रीत कुणाला कुणाची पर्वा नसते. इथे तुम्ही कुणासाठी कितीही केलं तरी ते कमीच असतं. पॉर्न इंडस्ट्रीत वातावरण फार ग्रेसफुल असतं. लोक इथे रोबोटसारखं काम करतात. जे सेक्सी नाही. जे दुसऱ्यांच्या आनंदासाठी असतं.6 / 8Sal हाही एक स्टार आहे. पॉर्न इंडस्ट्रीला जवळून पाहणारा सॅल म्हणाला की, 6 वर्षांचा असताना काही लोकांनी गॅंगरेप केला होता. यानंतर 16 वर्षांचा असताना त्याला कुटुंबियाने पैशांसाठी गे पॉर्न इंडस्ट्रीतही ढकललं. तो म्हणाला की, सेक्सी दिसण्यासाठी त्याने डाएट पिल्सचा ही आधार घेतला. तो म्हणाला, इथे कोणताही प्रोड्यूसर कंडोम यूज करण्याची परवानगी देत नाही. हैराण करणारी बाब ही आहे की, इंडस्ट्रीतील 80 टक्के कलाकार एचआयव्ही पॉझिटिव्ह असतात. 7 / 8Trent हा अशा लोकांपैकी एक आहे जो पॉर्न बनवणाऱ्यांना ड्रग्स विकतो. जुन्या आठवणींना उजाळा देत तो म्हणाला की, एकदा जेव्हा तो सेटवर पोहोचला तेव्हा जे त्याने पाहिलं ते हैराण करणारं होतं. ट्रेन्टनुसार, पॉर्न सेटवर एका तरूणीसोबत तीन लोक सेक्स करत होते. अशातच त्या तरूणीने सेटवर उलटी केली. तरूणी शूट करण्याच्या स्थितीत नव्हती. पण तरीही दिग्दर्शकाने शूट केलं. इंडस्ट्रीचा एकच फंडा आहे करा नाही तर काहीच मिळणार नाही.8 / 8Wayne ने सांगितलं की, जेव्हा त्याने पॉर्न बनवणं सुरू केलं तेव्हा हे काम मजेदार होतं. पण हळूहळू हे काम राक्षसासारखं होतं. इथे वेदना आहे, अपमान आहे. जे एखाद्या गादीखाली दाबलं जातं.