एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 15:24 IST
1 / 10असं म्हटलं जाते, एखादा व्यक्ती प्रेमात पडला असेल तर ते प्रेम मिळवण्यासाठी तो कुठल्याही स्तराला जाऊ शकतो. कुठलीही मर्यादा ओलांडू शकतो. सीमा पार करू शकतो. त्याला ना कुठल्या देशाचे बंधन असते, ना राज्याचे...2 / 10प्रेम कुणाचेही असो एखाद्या व्यक्तीचे अथवा प्राण्याचे...एका वाघाची अशीच अनोखी लव्ह स्टोरी समोर आली आहे. जो त्याच्या प्रेयसीला मिळवण्यासाठी सर्व अडचणींवर मात करत तिच्या शोधात निघाला आहे. हा वाघ महाराष्ट्राच्या जंगलातून प्रत्येक संकट मागे टाकून तेलंगणाला पोहचला आहे.3 / 10रिपोर्टनुसार, एक वाघाने त्याच्या प्रेयसी वाघिणीला शोधत जवळपास ५० किमी अंतरचा प्रवास केला आहे. वन विभाग त्याच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहे. या प्रवासात त्याने अनेक नद्या पोहून पार केल्या. 4 / 10वाघाच्या या प्रवासात त्याने अनेक जंगल पार केले, जिथे पावलो पावली धोका होता. दुसरे वाघ या वाघावर हल्ला करण्याचीही शक्यता होती. परंतु हा सर्व धोका त्याने तिच्या प्रेमासाठी पत्करला. हा वाघ शेवटचा मंचेरियलच्या जंगलात दिसला होता.5 / 10ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ वाघाच्या मेटिंगचा सीजन मानला जातो. त्यामुळे नर वाघाला मादी वाघिणीचा शोध असतो. या वाघाने महाराष्ट्राच्या चंद्रपूरहून चालत परानहिता नदी पोहत पार केली. त्यानंतर तेलंगणातील कागजनगर इथल्या टायगर कॉरिडोरमध्ये प्रवेश केला. 6 / 10माहितीनुसार, प्रेयसीच्या शोधात, खाणे आणि पाण्यासाठी वाघ कायम दीर्घ प्रवास करत असतो. या वाघाच्या हालचालींवर सातत्याने कॅमेऱ्याने लक्ष ठेवून त्यांना ट्रॅक केले जाते. त्यामुळे वाघाच्या लांबच्या प्रवासावर नजर ठेवणे शक्य होते.7 / 10चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हारगाव वन्यजीव अभयारण्यातून तो इटिखाल टेकड्यांचे जंगल ओलांडून तेलंगणाला पोहोचला. तिथून तो कागजनगर कॉरिडॉरकडे पुढे गेला. हा वाघ आसपासच्या गावांमधूनही जाण्याची शक्यता आहे.8 / 10वाघाच्या वाटेत कुठलाही मनुष्य येऊ नये आणि वाघ त्याला शिकार बनवू नये यासाठी वन विभागाने गावकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर पशुधनाचे नुकसान झाले तर त्यासाठी आवश्यक भरपाई करण्याची तरतूद कायद्यात आहे.9 / 10बऱ्याचदा वाघ एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जातात. या दरम्यान येणाऱ्या नद्याही वाघ पार करतात. काही वाघ पुन्हा माघारी फिरतात तर ज्यांना इथले वातावरण आवडू लागते ते तिथेच राहत असतात असंही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.10 / 10अलीकडेच नागपूर विभागातील गोंड पिंपरी येथे ४५ वर्षीय महिलेवर शेतात काम करत असताना वाघाने हल्ला केला. वाघाच्या वाढत्या हल्ल्यांनी गावकरीही दहशतीत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात यंदा ३२ जणांचा वाघांनी जीव घेतला आहे.