By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 22:48 IST
1 / 5जगभरात असे अनेक चित्रविचित्र फोटो आहेत, जे पाहिल्यानंतर तुम्हीही अचंबित व्हाल. मॉलसारख्या दिसणाऱ्या या इमारतीवर हे घर उलटं तरंगत असल्याचं पाहायला मिळतंय. तुम्हाला वाटेल हे घर हवेबरोबर उडून जाईल, परंतु तसं नसून या घराची रचनाच तशी करण्यात आलेली आहे. 2 / 5समुद्रकिनाऱ्यावरील हा फोटो स्वर्गसुखाचा आनंद देणारा आहे. तुम्ही म्हणाल या समुद्राचं पाणी असं कसं आहे. तर या समुद्रात असलेल्या जेली फिशमुळे या किनाऱ्यावर निळा प्रकाश मारल्याचा भास होतोय. खरं तर हा एक निसर्गाचा चमत्कारच आहे. 3 / 5या फोटोमध्ये वरून पाणी पडत असल्याचं दिसतंय. तसेच पाणी कोसळत असलेल्या खडकांमध्येच आग आहे. हासुद्धा निसर्गाचा एक चमत्कार असून, मिथेन गॅसमुळे या आगीच्या ज्वाळा दिसत आहेत. 4 / 5या नदीतलं पाणी नितळ आणि सुंदर फार क्वचित ठिकाणी पाहायला मिळतं, ही नाव पाण्यावर तरंगत नसून हवेत उडते आहे. असं पारदर्शक पाणी फार दुर्मीळ जागी असतं. 5 / 5खरं तर हा फोटो एका इमारतीचा आहे. फोटो पाहिल्यानंतर असं वाटेल की इमारतीच्या चहूबाजूला झाडं आहेत. झाडं फक्त समोरच्या ठिकाणी आहे. पण चहूबाजूला असल्याचाच भास होतो.