दोघी बहिणींच्या शरीरात होत्या ३ किडन्या; जन्माला येताच डॉक्टरांनी केली होती मृत्यूची भविष्यवाणी अन् आता..
By manali.bagul | Updated: January 7, 2021 17:56 IST
1 / 9जीवन आणि मरण या दोन्ही गोष्टी देवाच्या हातात असतात. असं म्हटलं जातं. देवाच्या इच्छेशिवाय कोणाचा जन्म होऊ शकत ना मरण. याच जीवंत उदाहरण वेल्सची राजधानी कार्डिफमध्ये पाहायला मिळालं आहे. या दोन्ही बहिणींचे शरीर एकमेकांशी जोडलेले आहे. जेव्हा या दोघींचा जन्म झाला होता तेव्हा जास्त काळ जगू शकणार नाहीत अशी भविष्यवाणी डॉक्टरांनी केली होती. डॉक्टरांचे म्हणणं खोटं ठरवत या दोघी आता कार्डिफच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत. 2 / 9मरियल आणि नदए यांचा जन्म २०१६ मध्ये झाला होता. जन्मापासूनच या दोघी एकमेकांशी जोडलेल्या होत्या. जेव्हा या दोघी सात महिन्यांच्या होत्या. तेव्हा त्यांचे वडील उपचारांसाठी ग्रेट ऑर्मोंड च्या रुग्णालयात घेऊन गेले होते. डॉक्टरांच्या निरक्षणाखाली असताना त्यांनी मृत्यूवर मात केली.3 / 9या दोघींचे शरीर जरी एकमेकांना जोडलेले असले तरी मेंदू, हृदय आणि फुफ्फुसं वेगवेगळी आहेत. यांचे लिव्हर ब्लॅडर आणि पोट एकच आहे. 4 / 9बीबीसीशी बोलताना मरियम आणि नदएच्या वडिलांनी सांगितले की, ''त्यांच्या मुलींचे जीवंत राहणं एखाद्या स्वप्नाप्रमाणे आहे. जास्तीत जास्त दिवस या दोघी जीवंत राहतील अशी मला आशा आहे.''5 / 9पुढे त्यांनी सांगितले की, ''या दोघींना शाळेत जायला खूप आवडतं. शाळेचा संपूर्णवेळ या दोघी इन्जॉय करतात.''6 / 9या दोघींपैकी मरियमचे हृदय खूप कमकुवत आहे. कधीही जीवाला धोका उद्भवू शकतो असं डॉक्टरांना वाटतं. त्यामुळे त्यांचे वडीलही चिंतेत आहेत. 7 / 9 या दोघींना वेगळं करण्यासाठी सर्जरीचा पर्याय असतानाही त्यांच्या वडिलांनी सर्दी करण्यास नकार दिला8 / 9कारण सर्जरी दरम्यान काही झाले तर त्यांना दोन्ही मुलींना गमवावं लागेल.9 / 9इब्राहिम जास्तीत जास्त वेळ आपल्या मुलींसोबत घालवण्यासाठी प्रयत्न करतात. (Image Credit- Asianetnews)