1 / 6जगाच्या पाठीवरील शेवटचा पांढरा नर गेंडा असणाऱ्या सुदानचा केनियातील ओल पेजेटा अभयाअरण्यात मृत्यू झाला. 2 / 6२००९ साली दोन माद्यांसह त्याला चेक रिपब्लिक येथून ओल पेजेटा अभयारण्यात आणण्यात आले होते. तो ४५ वर्षांचा होता. त्याचं नाव सुदान असं ठेवण्यात आलं होतं.3 / 6२००९ साली दोन माद्यांसह त्याला चेक रिपब्लिक येथून ओल पेजेटा अभयारण्यात आणण्यात आले होते. तो ४५ वर्षांचा होता. त्याचं नाव सुदान असं ठेवण्यात आलं होतं.4 / 6जगात एकूण चारच पांढरे गेंडे होते. त्यात सुदान हा एकमेव नर होता. त्याच्या सोबत दोन माद्या केनियातील अभयारण्यात आहेत. या प्रजातीच्या वंशवृद्धीसाठी अनेक ब्रीडिंगचे प्रयोग करण्यात आले पण त्यांना फारसं यश आलं नाही. 5 / 6सुदानचं वय वाढलं होतं, तो वृद्ध झाला होता. त्याचप्रमाणे त्याच्या पायातली ताकदही हळूहळू क्षीण होत गेली होती. आपल्या पायावर उभं राहण्यासही त्याला त्रास होत होता.6 / 6ओल पेजेटा हे अभयारण्य गेंड्यांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या संक्षणासाठी तसेच तस्करांपासून सुदानला वाचवण्यासाठी कडक सुरक्षा पुरवण्यात आली होती.