शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 09:54 IST

1 / 8
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे चिरंजीव डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर (४७) यांनी आपल्या आयुष्याची नवीन इनिंग सुरू करण्याची घोषणा केली आहे. पाम बीचमधील प्रसिद्ध सोशलाईट आणि परोपकारी व्यक्ती बेटिना अँडरसन (३९) यांच्याशी त्यांचा साखरपुडा झाला आहे. सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित एका खास कार्यक्रमात त्यांनी ही आनंदाची बातमी जगाला दिली.
2 / 8
साखरपुड्याची रंगतदार घोषणा या कार्यक्रमात बोलताना ट्रम्प ज्युनियर मिश्किलपणे म्हणाले, 'साधारणपणे माझ्याकडे शब्दांची कमतरता नसते, कारण मी खूप बडबड करतो. पण आज मी बेटिनाचे आभार मानू इच्छितो, तिने दिलेल्या एका शब्दासाठी... आणि तो शब्द म्हणजे 'हो'.' तर बेटिनाने देखील हा आपल्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय काळ असल्याचे सांगत ट्रम्प ज्युनियर यांचे आभार मानले.
3 / 8
बेटिना ही सुप्रसिद्ध समाजसेवक हॅरी लॉय अँडरसन ज्युनियर आणि इंगर अँडरसन यांची मुलगा आहे. ती पाम बीचच्या सामाजिक वर्तुळात अत्यंत सक्रिय आहे.
4 / 8
ती 'होप फॉर डिप्रेशन रिसर्च फाऊंडेशन' आणि फ्लोरिडा येथील 'प्रोजेक्ट पॅराडाइज' या संवर्धन मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावते.
5 / 8
ट्रम्प ज्युनियर आणि बेटिना गेल्या महिन्यात उदयपूर (राजस्थान) येथे एका लग्नासाठी भारतात आले होते, तेव्हा त्यांच्या नात्याची चर्चा चांगलीच रंगली होती.
6 / 8
वैयक्तिक प्रवास ट्रम्प ज्युनियर यांचे पहिले लग्न व्हेनेसा ट्रम्प यांच्याशी झाले होते (२००५-२०१८), ज्यांच्यापासून त्यांना पाच मुले आहेत.
7 / 8
त्यानंतर त्यांचे नाव फॉक्स न्यूजच्या माजी होस्ट किम्बर्ली गिलफॉयल यांच्याशी जोडले गेले होते. मात्र, २०२४ च्या उत्तरार्धात त्यांचे नाते संपुष्टात आले.
8 / 8
बेटिना आणि ज्युनियर ट्रम्प ऑगस्ट २०२४ पासून सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसत होते.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका