शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 13:17 IST

1 / 8
भारतीयांना परदेशात प्रवास करायला खूप आवडते. तांत्रिक प्रगती, सुलभ विमान प्रवास आणि इंटरनेटवर उपलब्ध माहितीमुळे लोक मोठ्या प्रमाणात परदेशात प्रवास करतात. यामध्ये थायलंड भारतीय पर्यटकांची पहिली पसंती बनत आहे. थायलंडचे सुंदर समुद्रकिनारे आणि स्वच्छता, आधुनिक जीवनशैली आणि पारंपारिक बौद्ध मंदिरे ही तिथली आकर्षण बिंदु आहेत. पण, तुम्हाला माहिती आहे का की जर तुम्ही १०,००० रुपये घेऊन थायलंडला गेलात तर तिथे काय काय करू शकता?
2 / 8
थायलंडच्या चलनाचा विचार केला तर, १ भारतीय रुपया हा थायलंडमध्ये ०.३७ थाई बाथ होतो. याचा अर्थ भारतीयांचे १०० भारतीय रुपये थायलंडमध्ये फक्त ३७.४६ थाई बाथ होतात.
3 / 8
यावरून असे दिसून येते की, भारतीय रुपयाचे मूल्य थाई बाथपेक्षा कमी आहे. म्हणून जर तुम्ही १०,००० रुपये घेऊन थायलंडला गेलात, तर तिथे त्याची किंमत फक्त ३,७५१.४९ बाथ असेल.
4 / 8
वेगवेगळ्या ठिकाणी चलनाचे दर वेगवेगळे असतात. विमानतळावर विनिमय करणे महाग असते, कारण त्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाते. जर तुम्हाला थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एक हॉटेल रूम किंवा गेस्ट हाऊसमध्ये एक रात्र घालवायची असेल तर, त्यासाठी तुम्हाला २००-५०० थायलंड बाथ मोजावे लागतील.
5 / 8
याचाच अर्थ तुम्ही १००० रुपयांत एका चांगल्या हॉटेलमध्ये एका रात्रीसाठी राहू शकता. याशिवाय, ६०-६५ थाई बाथमध्ये तुम्ही एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवू शकता.
6 / 8
थायलंडचे अधिकृत चलन थाई बाथ आहे. भारतीय रूपयाच्या तुलनेत थायलंडचा बाथ अधिक वजनदार आहे.
7 / 8
थायलंडचे चलन १०० सतांगमध्ये विभागलेले आहे. बँक ऑफ थायलंड येथे चलन जारी करते आणि नियंत्रित करते.
8 / 8
थायलंडच्या पर्यटन प्राधिकरणाच्या मते, २०२४ मध्ये २१ लाख भारतीय येथे फिरण्यासाठी आले होते. अहवालानुसार, चीन आणि मलेशियानंतर भारतीय पर्यटकांसाठी थायलंड तिसरा सर्वात आवडता देश आहे. थायलंडच्या अर्थव्यवस्थेला याचा भरपूर फायदा होतो.
टॅग्स :Thailandथायलंडtourismपर्यटन