By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 20:50 IST
1 / 6बालीचं उंबांग हाऊस हे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतं. या हॉटेलमध्ये समुद्रातल्या जलचर प्राण्यांबरोबर राहिल्याचा आभास होतो.2 / 6फ्रान्समधलं रिव्स हॉटेलही फुग्यासारखं आहे. तुम्ही या हॉटेलमध्ये एक रात्र घालवल्यावर तुम्हालाही फुग्यात असल्याचा अनुभव येईल. 3 / 6फिनलँडमधलं गोल्डन क्राऊन लेविन इग्लाट हे हॉटेल शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. इग्लूच्या आकाराच्या या हॉटेलमध्ये पहुडल्यास आकाशातल्या ता-यांची गुजगप्पा मारत असल्याचा भास होतो. 4 / 6सेंट लुसियामधलं जेड माऊंटन हे हॉटेलही एका उत्कृष्ट कलाकृतीचा नमुना आहे. या हॉटेलमधले कमरे मोठे असून, तुम्हाला इथं राहिल्यास कॅरिबियन जंगलात राहिल्यासारखं वाटतं. 5 / 6दक्षिण आफ्रिकेतल्या सेंचुरी मकान्यालय लक्झरी सफारी लॉज हे मेरिको नदीवर स्थित आहे. या लॉजमधून तुम्हाला निसर्गाचं अद्भुत सौंदर्य पाहण्याचा योग येईल. 6 / 6टांझानियातल्या मोंटा रिझॉर्टही पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतं. तीन मजल्यांच्या हॉटेलचा खालचा मजला हा पाण्यात बुडलेला आहे.