1 / 10वॉशिंग्टन : यंदाचे वर्ष संपण्यापूर्वी कोरोनावरील सुरक्षित आणि प्रभावी लस उपलब्ध होईल, असे आश्वासन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी दिले आहे.2 / 10याचबरोबर, आगामी निवडणुकीत पुन्हा निवडूनआलो, तर आशा, संधी आणि विकास आणखी पुढे घेऊन जाण्याचे आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉर्पोरेट जगाला दिले. 3 / 10याशिवाय, डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला की, 'चीनने जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार केला आहे आणि याला फक्त ट्रम्प प्रशासनच याला उत्तर देऊ शकते. मात्र, जर मी निवडून आलो नाही, तर २० दिवसांपेक्षा कमी कालावधीत अमेरिका चीनच्या ताब्यात जाईल.'4 / 10डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधून न्यूयॉर्क, शिकागो, फ्लोरिडा, पिट्सबर्ग, शोबॉयगन, वॉशिंग्टन डी.सी. च्या इकॉनॉमिक क्लबला संबोधित केले. यावेळी अमेरिकेसमोर एक सोपा पर्याय आहे. 5 / 10हा पर्याय माझ्या अमेरिकी समर्थक धोरणांनुसार ऐतिहासिक समृद्धी आहे की कट्टर डाव्या विचारसरणीनुसार प्रचंड दारिद्र्य आणि मंदी आहे, ज्यामुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये जाल, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.6 / 10एक ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लष्कराच्या रुग्णालयात चार दिवस उपचारांसाठी दाखल झाले होते. रुग्णालयातील उपचारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या तब्येतील सुधारणा झाली आणि त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे व्हाईट हाऊसच्या डॉक्टरांनी आता त्यांना निवडणूक सभांमध्ये उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.7 / 10याआधी मंगळवारी ट्रम्प यांनी पेन्सिल्व्हेनियामधील आपल्या समर्थकांमध्ये म्हटले होते की, 'मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात वाईट उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. तुम्हाला माहितच आहे की, ते काय करतात? यामुळे माझ्यावर अधिक दबाव पडत आहे. जर आपला अशा एखाद्या व्यक्तीकडून पराभव होईल, अशी कल्पना करू शकतो काय?' 8 / 10विरोधी उमेदवार ज्यो बायडन यांनी आपल्या भाषणात राष्ट्राध्यक्षपदाचे माजी रिपब्लिकन उमेदवार मिट रोमनी यांचे नाव कसे विसरले, याची आठवण डोनाल्ड ट्रम्प यांनी करून दिली.9 / 10यावेळी 'हे अविश्वसनीय आहे. ही एक वाईट गोष्ट आहे. हे अत्यंत लाजिरवाणे आहे. जर ते जिंकले तर सत्ता कट्टर डाव्यांच्या हातात जाईल आणि ते देश चालवणार नाहीत,' असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. 10 / 10याचबरोबर, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'आम्ही जिंकू आणि आणखी चार वर्षे व्हाइट हाऊसमध्ये राहू. ही निवडणूक एक सोपा पर्याय आहे. जर ज्यो बायडन जिंकले तर चीन जिंकेल. चीनसारखे इतर सर्व देश जिंकतील. सर्वजन आपल्याला नुकसान पोहोचवतील. जर आम्ही जिंकलो, तर तुम्ही जिंकला, पेन्सिल्व्हेनिया जिंकला आणि अमेरिका जिंकला. हे खूप सोपे आहे.'