एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 09:33 IST
1 / 10अमेरिकन न्याय विभागाने शुक्रवारी लैंगिक शोषणाच्या आरोपात दोषी आढळलेल्या जेफ्री एपस्टीनशी निगडित शेकडो दस्तावेज सार्वजनिक केले. या फाईल्समध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख नाही. परंतु डेमोक्रेटिकचे राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे नाव आणि अनेक फोटोही समोर आले आहेत.2 / 10डिप्टी अटॉर्नी जनरल टॉड ब्लांश यांनी सांगितले की, अमेरिकन काँग्रेसनं दिलेल्या मुदतीत शुक्रवारी लाखो दस्तावेज सार्वजनिक करण्यात आले आहेत आणि येणाऱ्या आठवडाभरात आणखी फाईल्स सार्वजनिक केले जातील. जारी केलेल्या फाईलमध्ये एपस्टीनशी संबंधित अनेक कायदा अंमलबजावणी तपासांचे पुरावे, छायाचित्रे आणि कागदपत्रे समाविष्ट आहेत.3 / 10एका फोटोमध्ये बिल क्लिंटन घिसलेन मॅक्सवेलसोबत स्विमिंग पूलमध्ये दिसत आहेत तर दुसऱ्या फोटोमध्ये क्लिंटन मायकल जॅक्सनसोबत दिसत आहेत, जिथे सुप्रीम्स गायिका डायना रॉस देखील उपस्थित आहे.4 / 10या कागदपत्रांमधून ट्रम्प यांचे नाव नसणे हा बराच चर्चेचा विषय आहे कारण १९९० आणि २००० च्या दशकाच्या सुरुवातीला एपस्टीन याच्याशी झालेल्या त्यांच्या संबंधांबाबत रेकॉर्ड यापूर्वी प्रसिद्ध झाले आहेत. फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध झालेल्या सुरुवातीच्या कागदपत्रांमध्ये ट्रम्प यांचे नाव एपस्टीनच्या खाजगी विमानाच्या फ्लाइट लॉगमध्ये दिसून आले.5 / 10राजकीय दबावानंतर ट्रम्प यांनी १९ नोव्हेंबर रोजी एका कायद्यावर स्वाक्षरी केली ज्यामध्ये न्याय विभागाला एपस्टीनशी संबंधित बहुतेक कागदपत्रे ३० दिवसांच्या आत जाहीर करण्याची आवश्यकता होती. 6 / 10व्हाईट हाऊसने याला प्रशासनाची 'सर्वात पारदर्शक' कारवाई म्हटले. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या अबेगेल जॅक्सन म्हणाल्या की, ट्रम्प प्रशासनाने डेमोक्रॅट्सपेक्षा एपस्टीनच्या पीडितांसाठी जास्त काम केले आहे.7 / 10तर बिल क्लिंटन यांच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले की, चौकशी क्लिंटन यांच्याविरुद्ध नाही. २० वर्षे जुनी अस्पष्ट छायाचित्रे प्रसिद्ध केल्याने सत्य बदलणार नाही असं सांगत त्यांनी ट्रम्प प्रशासनावर टीका केली.8 / 10न्याय विभागाच्या मते या फाईलींचा आढावा घेता एपस्टीन किंवा त्याच्या कुटुंबाशी संबंधित १,२०० हून अधिक पीडितांची ओळख पटली. पीडितांच्या वकिलांना त्यांची नावे सांगण्यास सांगितल्यानंतर ही आकडेवारी उघड झाली.9 / 10जेफ्री एपस्टीन हा एक अमेरिकन आर्थिक सल्लागार आणि गुंतवणूकदार होता. त्याच्यावर सेक्स ट्रॅफिकिंग, अल्पवयीन मुलींचे शोषण आणि संघटित गुन्हेगारीचे गंभीर आरोप होते. २०१९ मध्ये खटल्याच्या सुनावणीवेळी जेलमध्ये त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता.10 / 10या फाइल्समध्ये आतापर्यंत अनेक हाय-प्रोफाइल व्यक्तींची नावे समोर आली आहेत. ही नावे एपस्टीनच्या सामाजिक आणि व्यावसायिक नेटवर्कशी संबंधित आहेत, पण यापैकी प्रत्येकावर थेट गैरकृत्याचा आरोप नाही.