1 / 10कोरोनानं जगभरात हाहाकार माजवला असून, अनेक देशांची अवस्था बिकट आहे. अमेरिका, इटलीसारख्या देशांमध्ये लॉकडाऊन असल्यानं सगळेच व्यवहार ठप्प आहेत. 2 / 10या संकटाच्या काळातही अमेरिकेतल्या एका कुटुंबाला कचराकुंडीत दोन बॅगा सापडल्या आहे. विशेष म्हणजे या बॅगांमध्ये कोट्यवधी रुपये सापडले आहेत. 3 / 10पण त्या कुटुंबीयांनी प्रामाणिकपणा दाखवत ते पैसे पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत. आता त्यांच्या प्रामाणिकपणाचं सगळीकडूनच कौतुक होत आहे. व्हर्जिनियाचे डेव्हिड आणि एमिली शान्त्झ मुलांसह कॅरोलिन काउंटीतील त्यांच्या घराकडे पिकअप ट्रकनं जात होते. 4 / 10त्याचदरम्यान वाटेत थोडा पुढे गेल्यावर त्यांना रस्त्याच्या कडेला कचराकुंड्यातील दोन बॅगा दिसल्या. डेव्हिडने गाडी थांबवली आणि बॅगा उचलल्या. 5 / 10त्यावर सरकारी शिक्के होते. जे अमेरिकेच्या टपाल खात्याचे होते. डेव्हिडनं ती बॅग उचलली आणि ती गाडीत ठेवली, मग त्यानं गाडी चालू करून घर गाठलं. 6 / 10जेव्हा डेव्हिड आपल्या घरी पोहोचला तेव्हा त्याने बॅग उघडली. त्यामध्ये दहा लाख डॉलर्स किंवा सुमारे 7.50 कोटी रुपये प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये ठेवण्यात आले होते. 7 / 10प्लास्टिकच्या पिशव्यावर रोख तिजोरी असं लिहिलेलं होतं. त्यानंतर त्यांनी याविषयी कॅरोलिन काउंटी पोलिसांना कळविले. थोड्याच वेळात पोलिसांची टीम त्याच्या घरी पोहोचली. 8 / 10कॅरोलिन शेरिफ मेजर स्कॉट मॉसर यांनी सांगितले की, हे पैसे रस्त्यावर कसे पडले हे आम्ही शोधत आहोत. 9 / 10मोसेर म्हणाले की डेविड आणि एमिलीची प्रामाणिकता ही कोरोनाच्या या संकटातही लोकांसाठी एक उदाहरण आहे.10 / 10एवढे पैसे मिळून ते पोलिसांच्या स्वाधीन केल्यानं या दाम्पत्याच्या प्रामाणिकपणाला पोलिसांनीही सलाम ठोकला आहे.