शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 12:34 IST

1 / 10
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध ३ वर्षापासून सुरू आहे. त्यातच अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. २०२३ साली विक्टोरिया रोशचिना नावाची महिला पत्रकार जी जापोरिज्जिया येथे युक्रेनी नागरिकांना अवैधपणे ताब्यात घेणे, त्यांच्या यातना यावर रिपोर्टिंग करत होती. तिचा भयावह अंत झाल्याचं उघड झाले आहे.
2 / 10
२७ वर्षीय विक्टोरियाला रशियन सैन्याने ताब्यात घेतले होते. कित्येक महिने तिचा क्रूरतेने छळ केला. CBS रिपोर्टनुसार, विक्टोरियाचा मृतदेह युक्रेनला ताब्यात दिला तेव्हा फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये विक्टोरियासोबत भयंकर छळ आणि अमानुषपणे अत्याचार झाल्याच्या खूणा आढळल्याचं पुढे आले आहे.
3 / 10
विक्टोरियाच्या शरीरावर खरचटलेल्या खूणा, हाडे मोडली होती. गळ्यावर खोलवर जखमा होत्या, पायावर इलेक्ट्रिक शॉक दिल्याचेही दिसून आले. त्यातून अधिक हैराण करणारे म्हणजे विक्टोरियाचा मेंदू, डोळे आणि श्वसननलिका गायब आहे. विक्टोरिया यूक्रेनची पत्रकार असून ती दीर्घकाळापासून रशियानं कब्जा केलेल्या भागात ग्राऊंड रिपोर्टिंग करत होती.
4 / 10
विक्टोरियासोबत जे घडलं ते कुठल्याही युद्ध गुन्ह्यापेक्षा कमी नाही. २७ वर्षीय विक्टोरियाला रिपोर्टिंग करताना रशियन सैन्याने पकडले. त्यानंतर तिला मेलिटोपोल आणि त्यानंतर रशियाच्या टॅगानरोग इथल्या डिटेंशन सेंटरला पाठवले आहे. हे डिटेंशन सेंटर त्याच्या क्रूरतेसाठी कुख्यात आहे.
5 / 10
टॅगानरोग डिटेंशन सेंटरला विक्टोरिया जवळपास ८ महिने होती. या काळात तिच्यावर भयंकर अत्याचार करण्यात आले. ज्यात इलेक्ट्रिक शॉक देणे, हाडे मोडणे, नशेची औषधे देणे, उपासी ठेवणे आणि अन्य भयानक शिक्षेचा समावेश आहे. अखेर इतक्या यातना सहन करून तिचा सप्टेंबर २०२४ साली मृत्यू झाला.
6 / 10
विक्टोरिया रोशचिना ही युद्धातील एक पीडिता नव्हती तर युक्रेनमधील सर्वात निडर पत्रकार होती. ती रशियाने अवैधपणे कब्जा केलेल्या युक्रेनी भागात जाऊन तिथल्या लोकांची समस्या जाणून घेत जगासमोर सत्य आणत होती. सीक्रेट स्थळी जात तिथले काळे वास्तव समोर आणणे, नागरिकांचा छळ जगाला दाखवणे हे काम ती करत होती.
7 / 10
फेब्रुवारी २०२५ साली कैद्याच्या अदलाबदलीवेळी विक्टोरिया रोशचिनाचा मृतदेह रशियाने युक्रेनला सोपवला. तिचा मृतदेह अज्ञात पुरूष म्हणून दिला होता परंतु डिएनए चाचणीत तिची ओळख पटली. फॉरेन्सिक तपासणीत तिच्या मृतदेहाचे डोळे, मेंदू गायब असल्याचं आढळले. तिच्यावर झालेल्या क्रूरतेचे पुरावे लपवण्यासाठी हे केले असावे अशी शक्यता आहे.
8 / 10
यूक्रेनी सरकारी वकिलांनी विक्टोरियाचा मृत्यू युद्ध गुन्हा आणि पूर्वनियोजित हत्या असल्याचं सांगितले. राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की आणि युरोपीय संघाने या घटनेचा तीव्र निषेध केला. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. विक्टोरियाच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
9 / 10
विक्टोरियाचा मृत्यू रशियाच्या ताब्यात असताना झाला. त्याचे पुरावे मिळाले आहेत. रशियन कारवाईचा हा एक पॅटर्न असल्याचं समोर आले. जेव्हा युद्धग्रस्त क्षेत्रातील सत्य दडपण्यासाठी पत्रकारांना टार्गेट केले जाते. रशियन सैन्याकडून आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन, अवैधपणे अटक आणि रिपोर्टिंग रोखण्यासाठी पत्रकारांवर हिंसा केल्याचा दावा युक्रेनने केला आहे.
10 / 10
रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाला ३ वर्ष झाली आहेत. एकीकडे खार्किव आणि अन्य ठिकाणी रशियाकडून मिसाईल हल्ले जारी आहेत. दुसरीकडे पत्रकारांसाठी इथलं ग्राऊंड रिपोर्टिंग करणे जीवघेणे काम झाले आहे. तरीही सत्य समोर आणण्यासाठी पत्रकार प्रत्येक दिवशी हा धोका पत्करत आहेत.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाJournalistपत्रकार