1 / 7अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाच्या नवीन निर्बंधांमुळे बेल्जियमची भावी राणी एलिझाबेथ यांच्या हार्वर्ड शिक्षणामध्ये अडथळा निर्माण झाला आहे, ज्यामुळे राजघराण्यात चिंतेचं वातावरण आहे.2 / 7हार्वर्ड विद्यापीठात 'पब्लिक पॉलिसी' या विषयाचा अभ्यास करणाऱ्या बेल्जियमच्या राजकुमारी एलिझाबेथ यांच्या शैक्षणिक प्रवासात आता अडथळा निर्माण झाला आहे. ट्रम्प प्रशासनाच्या हार्वर्ड विद्यापीठामध्ये परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्याच्या निर्णयामुळे एलिझाबेथची पदव्युत्तर पदवी अनिश्चित अवस्थेत आहे.3 / 7बेल्जियमची २३ वर्षीय राजकुमारी एलिझाबेथ हार्वर्डमध्ये शिक्षण घेत आहे. तिने तिच्या अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष पूर्ण केले आहे. ती बेल्जियमचे राजा फिलिप आणि राणी मॅथिल्डे यांची सर्वात मोठी मुलगी आहे. तिला देशाची भावी राणी मानले जाते. हार्वर्डपूर्वी तिने युनायटेड किंग्डममधील ऑक्सफर्ड विद्यापीठातून इतिहास आणि राजकारणात पदवी मिळवली आहे.4 / 7ट्रम्प प्रशासनाने गुरुवारी हार्वर्ड विद्यापीठामध्ये परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आणि विद्यमान परदेशी विद्यार्थ्यांना इतर संस्थांमध्ये स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले. जर असे झाले नाही तर त्यांचा व्हिसाचा देखील रद्द होऊ शकतो.5 / 7'राजकुमारी एलिझाबेथने तिच्या अभ्यासाचे पहिले वर्ष पूर्ण केले आहे. ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाचा परिणाम पुढील काही आठवड्यात अधिक स्पष्ट होईल,' असे बेल्जियमच्या राजवाड्याच्या प्रवक्त्या लोरे व्हँडूर्न म्हणाल्या. दरम्यान, राजघराण्याचे संपर्क संचालक झेवियर बेयार्ट म्हणाले की, 'आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि स्थिरतेची वाट पाहत आहोत.'6 / 7हार्वर्ड विद्यापीठानेही ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय बेकायदेशीर आणि सूडबुद्धीने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. विद्यापीठाच्या मते, या निर्णयाचा परिणाम हजारो परदेशी विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि भविष्यावर होईल.7 / 7जर, या परिस्थितीत काही बदल झाला नाही तर, एलिझाबेथला तिचा अभ्यास मध्यात सोडावा लागू शकतो. अशा परिस्थितीत, ट्रम्प यांचे हे पाऊल केवळ सामान्य विद्यार्थ्यांच्या आयुष्यातच नाही तर, राजघराण्यातही खळबळ माजवत आहे.