1 / 7अमेरिकेने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. हार्वर्ड विद्यापीठाला परदेशी विद्यार्थ्यांचे प्रवेश न घेण्यास सांगितले आहे. तसेच नियमांचे पालन न केल्यावरून विद्यापीठाच्या निधीतही कपात केली आहे. अशातच चिनी विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द केले जाणार असल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. अशातच एक मोठी बातमी येत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची मुलगी देखील अमेरिकेतच वास्तव्याला असल्याचे समोर येत आहे. 2 / 7हार्वर्ड विद्यापीठात जे चिनी विद्यार्थी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधीत आहेत, त्यांना अमेरिकेबाहेर केले जाणार आहे. यामुळे आता या निर्णयामागे शी मिंगजे हिचे नाव जोडले जाऊ लागले आहे. तिनेदेखील हार्वर्डमध्येच शिक्षण घेतले आहे. सोशल मीडियावरील दाव्यांनुसार ती आताही अमेरिकेतच राहत आहे. जर अमेरिकेने चिनी विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द केले तर त्यात तिचेही नाव असणार असल्याचे सांगितले जात आहे. 3 / 7शी मिंगझे ही चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि प्रसिद्ध लोक गायिका पेंग लियुआन यांची एकुलती एक मुलगी आहे. एका गोपनिय नावाने २०१० मध्ये हार्वर्ड विद्यापीठात तिने प्रवेश घेतला होता. तिच्या सुरक्षेसाठी २४ तास चिनी बॉडीगार्ड तैनात असतात. तसेच अमेरिकेच्या एफबीआयलाही तिची माहिती आहे. एफबीआय देखील तिला सुरक्षा पुरविते. 4 / 7मिंगझे हिने २०१४ मध्येच मानसशास्त्र आणि इंग्रजीमध्ये कला शाखेची पदवी मिळविलेली आहे. ती सध्या अमेरिकेत काय करते याची कोणालाचा जास्त माहिती नाही. माईंड रिडर म्हणून तिची ख्याती आहे. 5 / 7शी मिंगझे ही साधे राहणीमान आणि मिसळून राहणारी तरुणी अशी स्तुती वॉन्टचायना टाईम्सने तिच्याबाबत केलेली आहे. तसेच तिला पुस्तके वाचणे आणि फॅशनची आवड आहे, असेही म्हटले होते.6 / 7२०१४ मध्ये तिचे शिक्षण पूर्ण झालेले असले तरी तिने 2019 मध्ये पुन्हा हार्वर्डला प्रवेश घेतल्याचे व शिक्षण सुरु केल्याचे सांगितले जात आहे. कारण एका तंत्रज्ञाने तिचे आयडी कार्ड लीक केले होते. यानंतर त्याला १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. 7 / 7तिच्याबाबत काही माहिती मिळत नसली तरी ती मॅसॅच्युसेट्समध्ये राहत असल्याचे दावे केले जात आहेत. ती ज्या भागात राहते त्या भागात पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) सुरक्षा कर्मचारी तैनात असतात असे सांगितले जात आहे.