जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 17:21 IST
1 / 7जगातील एक नयनरम्य देश सध्या हवामान बदलाच्या भीषण संकटाचा सामना करत आहे. समुद्राची वाढती पातळी या देशाला गिळंकृत करत असून, हळूहळू तो जगाच्या नकाशावरून नाहीसा होण्याच्या मार्गावर आहे. हा देश म्हणजे तुवालू, जो प्रशांत महासागराच्या मध्यभागी वसलेला आहे. 2 / 7निसर्गाची देणगी असलेला हा छोटासा देश आता मानवनिर्मित हवामान बदलाच्या दुष्परिणामांचा बळी ठरत आहे, ज्यामुळे त्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. जागतिक हवामान बदलाचा वेग इतका प्रचंड आहे की, तो आता केवळ एक इशारा नसून, तुवालूसारख्या देशांसाठी अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे.3 / 7जगाचा ७१% भाग पाण्याने वेढलेला असून, अनेक छोटे देश समुद्रात वसलेले आहेत. मात्र, तुवालूची नऊ लहान बेटे समुद्रात बुडण्याच्या गंभीर धोक्यात आहेत. हवामान बदलामुळे समुद्राची पातळी वाढत असल्याने, या बेटांचे भवितव्य अधांतरी आहे. ११,००० लोकसंख्येचा हा देश सध्या एकामागून एक संकटांना सामोरे जात आहे.4 / 7तुवालूची सरासरी उंची केवळ २ मीटर असल्याने, तो समुद्राच्या वाढत्या पातळीसाठी अत्यंत संवेदनशील आहे. नासाच्या अभ्यासानुसार, गेल्या ३० वर्षांत येथील समुद्राची पातळी ६ इंचांनी वाढली आहे, जी जागतिक सरासरीपेक्षा दीडपट अधिक आहे. हा वेग असाच राहिल्यास, २०५० पर्यंत तुवालूची राजधानी फुनाफुतीचा अर्धा भाग पाण्यात बुडण्याची शक्यता आहे, जिथे सुमारे ६०% लोकसंख्या राहते. शास्त्रज्ञांच्या मते, २१०० पर्यंत संपूर्ण बेट समुद्रात बुडण्याचा धोका आहे.5 / 7क्षेत्रफळाच्या दृष्टीने, तुवालू हा जगातील चौथा सर्वात लहान देश आहे, ज्याचे एकूण क्षेत्रफळ फक्त २६ चौरस किलोमीटर आहे. समुद्राच्या मध्यभागी वसलेला हा देश आकाशातून पाहताना अत्यंत सुंदर दिसतो, निळ्याशार पाण्याची चादर आणि हिरवीगार बेटे मनमोहक दृश्य तयार करतात. 6 / 7मात्र, या सौंदर्यामागे येथील रहिवाशांना अनेक गंभीर आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. बुडण्याच्या धोक्याव्यतिरिक्त, येथील लोकांना आणखी एका मोठ्या समस्येशी लढावे लागत आहे.7 / 7समुद्रात बुडण्याच्या धोक्याव्यतिरिक्त, तुवालूमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या आहे. समुद्राच्या खऱ्या पाण्यामुळे भूजल दूषित झाले आहे, त्यामुळे लोकांना भाज्यांसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी पावसाच्या टाक्यांवर अवलंबून राहावे लागते.