शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

...त्यामुळे समुद्रात येणार महाभयंकर भूकंप, कल्पनेपलिकडे असेल तीव्रता, संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 3:43 PM

1 / 7
लाखो वर्षे जुने छोटे जीव हे हिकुरंगी सबडक्शनमध्ये येणाऱ्या पुढील महाभयंकर भूकंपासाठी कारणीभूत ठरू शकतात, अशी धक्कादायक माहिती हल्लीच केलेल्या एका संशोधनामधून समोर आली आहे. न्यूझीलंडमदील सर्वात मोठा फॉल्ट, सबडक्शन झोन ही ती सीमा आहे जिथे पॅसिफिक प्लेट, ऑस्ट्रेलियन प्लेटच्या खाली जात आहे. या विभागात ८ मॅग्निट्युड पेक्षा अधिक मेगाथ्रस्ट तीव्रतेचा भूकंप येऊ शकतो.
2 / 7
भूकंप तज्ज्ञांच्या एका टिमने हिकुरंगी सबडक्शन झोनसाठी किनाऱ्यावर स्थित असलेल्या हंगरोआ फॉल्टवरील एका खडकाचा अभ्यास करत आहेत. या टीमचं नेतृत्व करत असलेले डॉ. कॅरोलिन बोल्टन यांनी सांगितलं की, मार्टिनबरो यांच्यापासून सुमारे ३५ किमी दक्षिण-पूर्वेला टोराजवळील दगडांवर चुनखडक, मडस्टोन आणि सिल्टस्टोन यांचे थर आहेत. या थरांमधून या सबडक्शन झोनमध्ये काय सुरू आहे याची माहिती मिळते.
3 / 7
अशीच खडके ३.५ ते ६.५ कोटी वर्षांपूर्वी समुद्र तळासी होती. मात्र ती अशा ठिकाणी होती जिथे त्यांचा अभ्यास करणे कठीण होते. मात्र जमिनीवर असलेल्या खडकांना पाहून समुद्रच्या तळाला काय चालू आहे. याचा अंदाज तज्ज्ञ घेऊ शकतात.
4 / 7
डॉ. बोल्टन यांनी सांगितले की, खडकांमध्ये कॅल्साइट आहे. ते प्राचीन एकपेशीय समुद्री जीव विशेष करून फोरामिनिफेरासारख्या प्लँक्टनपासून बनते. त्या छोट्या जीवांपासून बनलेले कॅल्साइट, सहडक्शन जोनमध्ये होणाऱ्या मुव्हमेंटवर परिणाम करू शकते. हे छोटे दीर्घकाळापासून मृत जीव दोन मोठ्या टेक्टॅनिक प्लेट यांत्रिक रूपाने कशा परस्पर क्रिया करतात, त्यावर परिणाम करू शकतात.
5 / 7
डॉ. बोल्टन यांनी सांगितले की, जर खकांमध्ये असलेले कॅल्साइट मिसळले गेले, तर फॉल्ट कमकुवत होऊ शकते आणि भूकंपाशिवाय सहजपणे स्लाइड होऊ शकते. मात्र जर कॅल्साइट धुसळले गेले नाही तर वॉल्ट उर्जेला स्टोअर करून लॉक होऊ शकतात. त्यामुळे मोठा भूकंप येऊ शकतो. जेव्हा तापमान कमी होते तेव्हा कॅल्साइट वेगाने विरघळते. मात्र जसजसे तापमान वाढत जाते, तसे त्याचे घुसळणे कठीण होते.
6 / 7
संशोधकांनी सांगितले की, सबडक्शन झोनमध्ये तापमान जमिनीच्या तुलनेमध्ये हळूहळू वाढते. त्यामुळे फॉल्ट प्रत्यक्षात कॅल्साइटबाबत संवेदनशील आहे. या जीवांपासून बनलेल्या कॅल्साइटचे प्रमाण आणि एकंदरीत वर्तनावरून पुढील भूकंप किती भयंकर असेल, याबाबतचा अंदाज येतो.
7 / 7
लिथोस जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, पुढील ५० वर्षांमध्ये हिकुरंगी सबडक्शन झोनमध्ये दक्षिण किनारपट्टीवर भूकंपाची शक्यता २६ टक्के आहे.
टॅग्स :Earthquakeभूकंपscienceविज्ञानInternationalआंतरराष्ट्रीय