थायलंडच्या राणीचे निधन, परंतू अंत्यसंस्कार वर्षभरानंतर करणार; काय आहे कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 13:11 IST
1 / 8थायलंडच्या राजघराण्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व आणि सध्याचे राजे वजीरालोंगकोर्न यांच्या मातोश्री, राणी सिरीकित यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी, २४ ऑक्टोबर रोजी निधन झाले. दीर्घकाळ राज्य करणारे दिवंगत राजे भूमीबोल अदुल्यादेज यांच्या त्या पत्नी होत्या. 2 / 8त्यांच्या निधनानंतर, थायलंडमध्ये शाही परंपरेनुसार आणि प्रोटोकॉलनुसार एक वर्षाचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया पुढील वर्षापर्यंत लांबणीवर पडली आहे.3 / 8थायलंडच्या अत्यंत कडक शाही नियमांनुसार, माजी राणी सिरीकित यांचे पार्थिव शरीर बँकॉकच्या ग्रँड पॅलेस मधील दुसित महा प्रसाद सिंहासन कक्षात ठेवण्यात येणार आहे. 4 / 8राजे वजीरालोंगकोर्न यांनी राणी सिरीकित यांच्या निधनाच्या तारखेपासून शाही कुटुंब आणि दरबारातील अधिकाऱ्यांसाठी एक वर्षाचा शोककाळ घोषित केला आहे.5 / 8या शोककाळात सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विशेष शोक पोशाख परिधान करणे बंधनकारक आहे.6 / 8ध्वज अर्ध्यावर: सर्व सरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक आस्थापनांवर ३० दिवसांसाठी राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल.7 / 8थायलंडमधील जनतेला कायद्याने शोक पाळणे बंधनकारक नसले तरी, राष्ट्रीय शोककाळात नागरिकांनाही किमान ९० दिवस काळ्या रंगाचे (Black) किंवा शोक दर्शवणारे वस्त्र परिधान करण्याची अपेक्षा असते. 8 / 8तसेच, मनोरंजन आणि उत्सव-संबंधित कार्यक्रमांवरही ३० दिवसांसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. असे असले तरी देखील ब्लैकपिंक कॉन्सर्ट होणार आहे. हा कार्यक्रम आधीच ठरलेला असल्याने आणि तिकिटे विकली गेल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.