शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine Crisis: जमिनी युद्धासाठी रणगाडे सज्ज; युक्रेनच्या सैनिकांनी ताबडतोब बंकरही खोदले, रस्त्यांवर धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 14:53 IST

1 / 7
रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव आता अधिकच चिघळला आहे. गुरुवारी रशियाने युक्रेनशी युद्ध सुरू केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. एवढेच नाही, तर युक्रेन-रशिया युद्ध आता टाळता येणार नाही, असेही पुतीन यांनी म्हटले आहे.
2 / 7
रशियाने लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर युक्रेनमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. युक्रेनची राजधानी कीववर क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. याचबरोबर लष्करी कारवाईची घोषणा करत पुतिन यांनी या प्रकरणात कोणीही हस्तक्षेप करू नये, अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकीही दिली.
3 / 7
क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर युक्रेनच्या मारियुपोल शहरात रणगाडे दिसले आहेत. याशिवाय. विमानतळाजवळील लष्कराच्या जागेतून धूर निघताना दिसत आहे. इतर शहरांतील विमानतळांवरही हल्ले झाले आहेत.
4 / 7
युक्रेनची राजधानी कीवमध्ये गोळीबार आणि स्फोटाचे आवाज ऐकू आले असल्याचे वृत्त 'एएफपी' या वृत्तसंस्थेने दिले आहे. रशियाच्या हवाई दलाने युक्रेनवर एअर स्ट्राइक सुरू केला. युक्रेनच्या हद्दीत शिरलेल्या रशियन लढाऊ विमाने असल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
5 / 7
युक्रेनच्या सैन्याने देखील रशियाला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी रशियाने बॉम्ब हल्ले सुरू केले असून रशियाची पाच विमानं देखील भक्ष्यस्थानी आली आहेत.
6 / 7
युक्रेनच्या लष्कराने युद्धादरम्यान मोठा दावा केला आहे. युक्रेनमधील Shchastya शहर सध्या युक्रेनच्याच ताब्यात आहे. त्यांनी तिथे 50 रशियन सैनिकांना ठार केल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय, सहा विमानेही खाली पाडण्यात आली आहे. यापूर्वी पाच विमाने आणि हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला होता.
7 / 7
रशियाने बॉम्ब हल्ले सुरू केल्यानंतर युक्रेनचे रणगाडे सक्रिय झाले आहेत. युक्रेनच्या सैन्याला अमेरिका आणि नाटो देशांनी युद्ध सामग्री पोहोचवल्याचं सूत्रांनी सांगितलंय. तसेच युक्रेनच्या सैनिकांकडून बंकरही खोदण्यात आले आहे.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशिया