शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

खतरनाक! स्पेनमध्ये २२ हजार धक्क्यांनंतर ज्वालामुखीचा स्फोट, फोटोत बघा कसं झालं घरांचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 15:15 IST

1 / 7
स्पेनच्या ८५ हजार लोकसंख्या असलेल्या पाल्मा आयलॅंडवरील कंब्रे विएजा ज्वालामुखीचा रविवारी उद्रेक झाला. यादरम्यान ११०० डिग्री सेल्सिअस तापमानापेक्षा जास्त उष्ण लाव्हारस शेकडो फूट वर उडताना दिसला. आकाशात धुर आणि राखेचे लोळ दिसून आले.
2 / 7
ज्वालामुखीचा स्फोट झाल्याने १०० पेक्षा जास्त घरे उद्ध्वस्त झालीत. तर ५ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. यात ५०० परदेशी पर्यटकही आहेत. स्पेनचे सिव्हिल गार्ड बल म्हणाले की, १० हजार लोकांना तेथून दुसरीकडे हलवावं लागेल.
3 / 7
स्पेनच्या नॅशनल जियोलॉजी इन्स्टिट्यूटचे प्रमुख इताहिजा डोमिनगुएज म्हणाले की, साधारण ५० वर्षांनी ज्वालामुखीचा उद्रेक होण्याआधी आयलॅंडवर २२ हजारांपेक्षा जास्त वेळा भूकंपाचे झटके जाणवले. याआधी या ज्वालामुखीचा १९७१ उद्रेक झाला होता.
4 / 7
८५ हजार लोकसंख्या असलेला पाल्मा आफ्रिकेच्या पश्चिम तटाजवळ स्पेनच्या कॅनरी द्वीपसमूहाच्या आठ ज्वालामुखींपैकी एक आहे. रविवारी ज्वालामुखीचा विस्फोट झाल्यानंतर १८-२० मिलियन क्युबिक लाव्हारस वाहून गेला. ला पाल्माचे अध्यक्ष मारियानो हेरनानंदेह म्हणाले की, लाव्हारस वाहत असल्याने तटावरील लोकवस्तींमध्ये चिंता वाढली आहे.
5 / 7
स्पेनच्या नॅशनल जिऑलॉजी इन्स्टिट्यूटचे प्रमुख इताहिजा डोमिनगुऐज म्हणाले की, ज्वालामुखी फुटण्याची प्रक्रिया कधीपर्यंत चालेल सांगता येणार नाही. मात्र, गेल्यावेळी साधारण ३ आठवडे ज्वालामुखीत स्फोट होत होते.
6 / 7

7 / 7

टॅग्स :Volcanoज्वालामुखीInternationalआंतरराष्ट्रीय