Russia-Ukraine: रशियासोबत तणाव वाढला, जो बिडेन यांनी युक्रेनमध्ये राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांना देश सोडण्यास सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 12:39 IST
1 / 12 सोव्हिएत युनियनमधून वेगळा झाल्यापासून रशिया (Russia) आणि युक्रेन(Ukraine) यांच्यात अंतर्गत संघर्ष पाहायला मिळत आहे. युक्रेन हा रशियाचाच भाग असून त्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे मात्र अनेक रशियन हे स्वतंत्र अस्तित्व मान्य करत नाहीत.2 / 12 अशात युक्रेन आणि नाटो (NATO) देशांची जवळीक हा रशियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. युक्रेनला नाटोचं सदस्यत्व मिळण्याला रशियाचा तीव्र विरोध आहे. तसं झालं तर आशियातील रशियाचं महत्त्व कमी होणार, अशी भीती रशियाला आहे.3 / 12 रशियाने युक्रेनच्या सीमेवर सैन्य तैनात केल्याने अमेरिका तसेच, युरोपीय महासंघाने रशियाच्या या बाबीचा निषेध करत युक्रेनच्या संरक्षणासाठी सर्वोतपरी मदत करण्याची ग्वाही दिली होती.4 / 12 दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (US President Joe Biden)यांनी सोमवारी रशियातील धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य अधिकाऱ्यांव्यतिरिक्त इतर सर्व अमेरिकन नागरिकांना यूक्रेन सोडण्यास सांगितले आहे. 5 / 12 बायडेन यांनी व्हाइट हाउसमध्ये जर्मनीचे चांसलर ओलाफ शोल्जसोबत एक संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यापूर्वी दोन्ही नेत्यांनी यूक्रेनच्या संकटावर चर्चा केली. 6 / 12 अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने यूक्रेन(Ukraine) मध्ये असलेल्या आपल्या सर्व बिगर महत्वाच्या नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना परत येण्याची परवानगी दिली आहे. तसेच, विशेष अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना परत येण्याची अपील केली आहे.7 / 12 बिडेन पुढे म्हणाले की, रशियाने टँक्स आणि सैन्यबळाच्या मदतीने यूक्रेनविरोधात कारवाई केली, तर रशिया आणि जर्मनीदरम्यान असलेली नैसर्गिक गॅस पाइपलाइन ‘नोर्ड स्ट्रीम 2’ कायम राहणार नाही. 8 / 12 फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन चर्चेसाठी रशियामध्ये आहेत, तर युक्रेनमधील अडथळे सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांचा एक भाग म्हणून समन्वय साधण्यासाठी जर्मन चांसलर स्कोल्झ वॉशिंग्टनमध्ये आहेत.9 / 12रशियाने आपल्या शेजाली युक्रेनवर हल्ला करण्याची कोणतीही योजना नसल्याचे सांगितल आहे. परंतु युक्रेन किंवा इतर कोणत्याही माजी सोव्हिएत देशाला नाटो (उत्तर अटलांटिक करार संघटना) मध्ये सामील होण्यापासून रोखण्यासाठी अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांवर दबाव आणत आहे.10 / 12 रशियाने या प्रदेशात शस्त्रे तैनात करणे आणि पूर्व युरोपमधून नाटो सैन्याची माघार थांबविण्याचे आवाहन केले आहे. अमेरिका आणि नाटोने रशियाच्या मागण्या फेटाळल्या आहेत.11 / 12युक्रेन संकट संपवण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्न तीव्र झाले आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन मॉस्कोमध्ये आणि जर्मन चांसलर ओलाफ शुल्झ वॉशिंग्टनमध्ये चर्चा करत आहेत. यापूर्वी रशियाने बेलारुसमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रे तैनात केल्याची बातमी आली होती. 12 / 12 यामध्ये S-400 हवाई संरक्षण प्रणाली आणि इस्कंदर क्षेपणास्त्राचा समावेश आहे. रशियाने बेलारुसच्या युक्रेनच्या सीमेजवळ सैन्याच्या तीन तुकड्या तयार केल्या आहेत. ज्यांच्याकडे एक प्राणघातक शस्त्र आहे. सॅटेलाइट फोटोंमधून ही माहिती समोर आली आहे.