शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Russia Ukraine war : संकटात झेलेन्स्की यांची ढाल बनणार अमेरिका-ब्रिटन! रेस्क्यूसाठी तयार केलाय सिक्रेट प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2022 7:57 PM

1 / 8
रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात जबरदस्त युद्ध सुरू आहे. यातच, युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या सुरक्षेबाबतही सतर्कता बाळगली जात आहे. युक्रेनचे राष्ट्रपती देश सोडून पोलंडला गेले असल्याचा दावा नुकताच रशियाकडून करण्यात आला होता.
2 / 8
खरे तर, रशियाचा हा दावा युक्रेनने ताबडतोब फेटाळून लावला होता. आता वृत्त आहे, की यूके आणि यूएसचे स्पेशल फोर्स (UK and US special forces) हाय रिस्कमध्ये युक्रेनच्या राष्ट्रपतींना देशातून बाहेर काढण्यासंदर्भात प्लॅन तयार करत आहेत.
3 / 8
सीक्रेट प्लॅनची तयारी - यूके स्पेशल फोर्स आणि एसएस कमांडोने म्हटले आहे की, ते युद्धाच्या काळात युक्रेनचे राष्ट्रपती Volodymyr Zelensky यांना देशातून बाहेर काढण्याचे प्लॅनिंग करत आहोत.
4 / 8
तत्पूर्वी, अमेरिकेने युक्रेनच्या राष्ट्रपतींना अनेक वेळा देशातून बाहेर पडण्याची ऑफर दिली होती. मात्र, झेलेन्स्की यांना ते मान्य नव्हते.
5 / 8
युक्रेनच्या राष्ट्रतींना केले जातेय टारगेट - Treacherous mission अंतर्गत युक्रेनच्या राष्ट्रपतींना बाहेर काढण्यासाठी यूके आणि यूएसची सेना एकत्रित आली आहे. 'मिरर'ने दिलेल्या वृत्तानुसार, Russian Spetsnaz special forces युक्रेनच्या राष्ट्रपतींना निशाना बनवत आहेत. राष्ट्रपतींवर तीन वेळा हल्ल्याचा प्रयत्नही झाला आहे.
6 / 8
अमेरिकेची ऑफर धुडकावली - यूएस सैन्याने यापूर्वी युक्रेनच्या राष्ट्रपतींना देशातून बाहेर काढण्यासंदर्भात ऑफर दिली होती. मात्र, ती राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी नकारली होती. एवढेच नाही, तर आम्हाला रशियाविरूद्ध लढण्यासाठी शस्त्र हवे आहेत, असेही त्यांनी म्हटले होते.
7 / 8
अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेदरम्यान, रशिया विरुद्ध लढण्यासाठी आम्हाला आर्थिक आणि लष्करी मदतीची आवश्यकता भासेल, असे झेलेन्स्की यांनी म्हटले होते.
8 / 8
यूके आणि यूएसचे सैनिक घेतायत प्रशिक्षण - द सनच्या वृत्ताचा हवाला देत मिरर'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जवळपास 70 यूकेचे सैनिक आणि 150 अमेरिकन सैनिक युक्रेनच्या सैनिकांसोबत बचाव अभियानासाठी प्रशिक्षण घेत आहेत.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाAmericaअमेरिकाEnglandइंग्लंडUSअमेरिका