शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पोर्तुगिजांनी ३०० वर्षांपूर्वी भारताला लुटलेले; समुद्री चाच्यांनी बुडवलेले गलबत सापडले, अब्जावधींचा खजिना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 10:35 IST

1 / 11
समुद्राच्या तळाशी शेकडो वर्षांपूर्वी बुडालेल्या जहाजांचा शोध घेणाऱ्या पुरातत्ववाद्यांना पाण्याखाली एक पोर्तुगिज जहाज सडलेल्या अवस्थेत सापडले आहे. या जहाजातून सुमारे ३०० वर्षांपूर्वी भारतातून लुटलेले सोने, चांदी युरोपला नेले जात होते. त्यावर समुद्री लुटारुंनी हल्ला केला तेव्हा हे जहाज बुडाले होते.
2 / 11
या जहाजामध्ये एवढा प्रचंड खजिना आहे की त्याची किंमत १०१ दशलक्ष पौंड म्हणजेच सुमारे ११.७४ अब्ज रुपये आहे. नोसा सेनहोरा दो काबो नावाचे हे जहाज आहे.
3 / 11
गोव्याहून माल घेऊन लिस्बनला जात असताना या जहाजावर समुद्री चाच्यांनी हल्ला केला होता. ते वर्ष होते १७२१. पोर्तुगिज भारतातील सोने, हिरे सर्व काही लुटून आपल्या देशात नेत होते. तेव्हा गोव्यावर पोर्तुगिजांचे राज्य होते.
4 / 11
८-१७ एप्रिल १७२१ या काळात या जहाजावर समुद्री चाच्यांनी लूट केली होती. या चाच्यांचा म्होरक्या ऑलिव्हियर डी बझार्ड लेव्हॅसर होता. हा काळ समुद्री चाच्यांचा सुवर्णकाळ होता असे सांगितले जाते.
5 / 11
या काळात युरोपिय देश अमेरिका, भारतासह जगभरातील अनेक देशांवर वर्चस्व करत होते. तेथील साधनसंपत्ती लुटून आपल्या देशात नेत होते. या लुटलेल्या संपत्तीला लुटण्यासाठी समुद्रात लुटारुंची जहाजे असायची. ती ही जहाजे लुटत होती.
6 / 11
गोव्याहून निघालेल्या या जहाजावरील संपत्तीची देखील अशीच लूट करण्यात आली होती. परंतू, हे जहाज बुडाल्याने बहुतांश सोन्याचा खजिना हा पाण्याखाली गेला होता. असे असले तरी ही एका सर्वात मोठ्या कुख्यात लुटीपैकी एक मानली जाते.
7 / 11
या जहाजावर अब्जावधींच्या सोने, चांदीसोबत २०० गुलाम देखील होते. ज्यांना पोर्तुगालमध्ये काम करण्यासाठी नेले जात होते. त्यांचे काय झाले हे आजपर्यंत समजले नाही.
8 / 11
या जहाजावर मोठी शस्त्रसामुग्री देखील तैनात होती. तरीही समुद्री चाच्यांनी त्यावर कब्जा केले होता. यामुळे तेव्हा पोर्तुगालची मोठी नाचक्कीही झाली होती.
9 / 11
संशोधकांना हे जहाज शोधण्यासाठी १६ वर्षे घालवावी लागली. मादागास्करच्या ईशान्य किनाऱ्यावरील नोसी बोराहा बेटाजवळील अंबोडिफोटात्राच्या उपसागरात ऐतिहासिक जहाजाचे अवशेष सापडले आहेत.
10 / 11
हे जहाजाचे अवशेष जिथे मिळाले त्या परिसरात ३,३०० हून अधिक कलाकृती सापडल्या आहेत. यात पुतळे, मुर्त्या, सोन्या चांदिच्या घडणावळी, मोती आणि मोठमोठे पेटारे सापडले आहेत.
11 / 11
ब्राउन विद्यापीठातील संशोधक ब्रँडन ए. क्लिफर्ड आणि मार्क आर. अगोस्टिनी यांनी या सगळ्याची किंमत £१०८ दशलक्षपेक्षा जास्त असू शकते असे म्हटले आहे.
टॅग्स :Portugalपोर्तुगालgoaगोवा