शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

गॉसिप करणं पडेल महागात; पकडलं तर होणार ही शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 14:05 IST

1 / 5
माणसाच्या स्वभावामध्ये गॉसिप करणे सवयीचं झालंय, कधीही कोणती घटना घडली तर गॉसिप केलं जातं. घरापासून ऑफिसपर्यंत, रस्त्यावरुन संसदेपर्यंत, कानाकोपऱ्यात गॉसिप केलं जातं.
2 / 5
अफवांचे कारणही गॉसिप आहे. या कारणामुळे एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे. फिलीपिंसमधील Binalonan मध्ये प्रशासनाने गॉसिपवर बंदी आणली आहे. त्यामुळे जर याठिकाणी तुम्ही गॉसिप कराल तर तुम्हाला शिक्षेला सामोरे जावे लागेल.
3 / 5
या कायद्यामुळे लोकांमध्ये आपण काय बोलता याचं भान राहील असं प्रशासनकडून सांगण्यात येत आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण काय बोलतो याचे भान राखायला हवं यासाठी कायदा बनवला आहे.
4 / 5
या कायद्यातंर्गत जर तुम्ही गॉसिप करताना पकडले गेलात तर पहिल्यांदा तुम्हाला 721 रुपयांचा दंड होईल. त्याचसोबत तीन तासांसाठी रस्त्यावरील कचरा उचलण्याची शिक्षा केली जाईल.
5 / 5
जर दुसऱ्यांदा तुम्ही हा कायदा मोडला तर 1400 रुपये दंड आणि 8 तासांसाठी सामाजिक सेवा करण्याची शिक्षा दिली जाणार आहे. मात्र अद्याप या कायद्यातंर्गत गॉसिप नेमकं कशाला मानलं जाणार याच्या तरतुदी तयार केल्या नाहीत.