१९७१ नंतर पहिल्यांदाच असं घडतंय; बांगलादेशात पाकिस्तानचं सरकारी जहाज येतंय, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 14:32 IST
1 / 10१९७१ च्या फाळणीनंतर पहिल्यांदाच पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये अधिकृतपणे व्यापार सुरू झाला आहे. बांगलादेशला सरकारने मान्यता दिल्यानंतर पाकिस्तानमधील कासिम बंदरातून पहिल्यांदा मालवाहतूक रवाना होणे हे ऐतिहासिक पाऊल आहे2 / 10बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस पाकिस्तानशी जवळचे संबंध प्रस्थापित करत असताना दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये हा एक नवीन अध्याय म्हणून पाहिला जात आहे.3 / 10पाकिस्तानने ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तानच्या माध्यमातून ५० हजार टन तांदूळ बांगलादेशाला निर्यात करण्याचा करार केला आहे. या कराराला फेब्रुवारीच्या सुरुवातीला अंतिम स्वरूप प्राप्त झाले. दोन टप्प्यात तांदळाची खेप बांगलादेशला पाठवली जाईल.4 / 10२५ हजार टन तांदळाची पहिली खेप बांगलादेशासाठी रवाना झाली आहे तर दुसरी खेप मार्च महिन्याच्या सुरूवातीला पाठवली जाईल. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा सरकारी मान्यतेने पाकिस्तानी नॅशनल शिपिंग कॉर्पोरेशनचं एक जहाज बांगलादेशच्या बंदरावर पोहचेल.5 / 10याआधी मागील वर्षी पाकिस्तानच्या एका खासगी कंपनीचे जहाज बांगलादेशात पोहचले होते परंतु हे सरकारी करारानुसार नव्हते. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या अंतरिम सरकारने भारताविरुद्ध राजनैतिक हालचाली करण्याबरोबरच पाकिस्तानशी संबंध मजबूत करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत.6 / 10या वर्षाच्या सुरुवातीला बांगलादेश लष्कराच्या एका उच्चपदस्थ जनरलने पाकिस्तानला भेट दिली जिथे त्यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख सय्यद आसिफ मुनीर आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेतली. 7 / 10यानंतर लगेचच पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या आयएसआयच्या अधिकाऱ्यांनीही बांगलादेशला भेट दिली ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ झाले.8 / 10पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय बांगलादेशमधील १९७१ पूर्वीच्या मोक्याच्या ठिकाणांना पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न करत आहे. भारताच्या शेजारील राज्यांमधील दहशतवाद्यांना मदत करणे आणि भारताला अस्थिर करण्यासाठी त्यांना पाठिंबा देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. 9 / 10मोहम्मद युनूसला पाठिंबा देणारी बांगलादेशातील कट्टरपंथी जमात-ए-इस्लामी या योजनेला पूर्ण पाठिंबा देत आहे. युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची ही भूमिका भारतविरोधी आहे, जिथे ते पाकिस्तानशी संबंध दृढ करून आपली धोरणे राबवत आहेत10 / 10पाकिस्तानसोबतचा हा नवीन व्यापार करार आणि आयएसआयची सक्रियता यामुळे बांगलादेशमध्ये भारताच्या सुरक्षेसाठी नवीन आव्हाने निर्माण होऊ शकतात.