लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
ना रस्ते, ना कार; या ठिकाणी साकारतेय जगातले अनोखे शहर
By बाळकृष्ण परब | Updated: January 11, 2021 23:31 IST
1 / 6शहर म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात त्या उंचच उंच इमारती, मोठमोठे रस्ते आणि आलिशान कार. मात्र आता असे एक शहत विकसित होत आहे जिथे वर उल्लेख केलेल्यांपैकी काहीही असणार नाही. 2 / 6हो हे खरं आहे. सौदी अरेबियाने असे शहर विकसित करण्याची घोषणा केली आहे. सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांनी या शहराला आकार देण्याची योजना सादर केली आहे. सौदी अरेबिया सध्या तेलावरील अवलंबित्व संपवून नव्या शोधांच्या दिशेने वळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ही योजना त्याचाच एक भाग आहे. आता पुढच्या काहीच महिन्यांमध्ये या शहराच्या उभारणीला सुरुवात होणार आहे. 3 / 6bloomberg.com ने दिलेल्या वृत्तानुसार नवे शहर सुमारे १७० चौकिमी क्षेत्रात विस्तारलेले असेल. त्याचे नाव द लाइन असेल. हे शहर सौदी अरेबियाच्या निओम प्रकल्पाचा भाग असेल. सौदी अरेबिया निओम प्रकल्पावर ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर (३६ लाख कोटी रुपये) एवढा खर्च करत आहे. 4 / 6सौदी अरेबियाने याबाबत सांगितले की, भविष्यात या शहरामध्ये कार्बन उत्सर्जन होणार नाही. सौदी सरकारच्या पत्रकानुसार नव्या शहरामध्ये लोक पायी चालतील आणि हे शहर निसर्गाच्या शेजारी असेल. नव्या शहरामध्ये सुमारे १० लाख लोक राहतील. २०३० पर्यंत या शहरामधून सुमारे तीन लाख ८० हजार रोजगार निर्माण होतील. शहरातील आधारभूत संरचनांच्या बांधकामासाठी १०० ते २०० दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढा खर्च येईल. 5 / 6क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी २०१७ मध्ये निओम प्रोजेक्टची घोषणा केली होती. सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठा खनिज तेल निर्यातदार देश आहे. मात्र आता सलमान हे देशाची आर्थिक स्थिती चांगली राहावी यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये विविधता आणण्याा प्रयत्न करत आहेत.6 / 6सलमान यांनी या अनोख्या शहराची उभारणी करण्याची योजना सादर करताना सांगितले की, विकासासाठी आम्ही निसर्गाचा बळी का घेतला पाहिजे? ते म्हणाले की, हे शहर मानवतेसाठी क्रांतीसारखे असेल. या शहरामध्ये एकावेळी २० मिनिटांपेक्षा अधिक चालण्याची गरज नसेल. त्यामुळे या शहराच्या आसपास अल्ट्रा हायस्पीड ट्रान्झिस्ट आणि ऑटोनोमोस मोबिलिटी सोल्युशन उपलब्ध असतील.