शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

ग्रीसमध्ये नरेंद्र मोदींचं मोठ्या जल्लोषात स्वागत, पाहा PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 15:19 IST

1 / 6
पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावर आहेत. ब्रिक्स परिषदेत सहभागी झाल्यानंतर नरेंद्र मोदी शुक्रवारी ग्रीसमध्ये पोहोचले आहेत. नरेंद्र मोदी ग्रीसची राजधानी अथेन्सला आपल्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांचे ग्रीसमध्ये आगमन होताच ग्रीसचे परराष्ट्र मंत्री जॉर्ज गेरापेटेरिटिस यांनी विमानतळावर भव्य स्वागत केले.
2 / 6
जवळपास ४ दशकांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय पंतप्रधान ग्रीसला भेट देत आहेत. ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्या खास निमंत्रणावरून नरेंद्र मोदी अथेन्सला पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक विमानतळावर दाखल झाले होते.
3 / 6
नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर हजारो लोकांनी ढोलताशांच्या गजरात स्वागत केले. नरेंद्र मोदींनीही तिथल्या लोकांची मोठ्या प्रेमाने भेट घेतली. ते लहान मुलांशी संवाद साधतानाही दिसले. ते अथेन्समधील हॉटेल ग्रॅन्डे ब्रेटाग्ने येथे थांबणार आहेत.
4 / 6
ग्रीसमधील भारतीय समुदायाने नरेंद्र मोदींचे जोरदार स्वागत केले. येथे शीख समाजातील अनेक लोकांनी त्यांची भेट घेऊन आनंद व्यक्त केला. येथील शीख समुदायाच्या लोकांच्या हातात नरेंद्र मोदींच्या स्वागताचे फलक होते. त्यांनी जल्लोषात घोषणाबाजी करून मोदींचे स्वागत केले.
5 / 6
लहान मुलेही नरेंद्र मोदींना ग्रीसमध्ये भेटली. मोदींच्या भेटीनंतर मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. होता. मोदींनीही त्यांच्याशी चर्चा केली. तेथील परंपरेनुसार मुलांनीही मोदींचे स्वागत केले.
6 / 6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अथेन्समध्ये ग्रीसच्या राष्ट्रपती कॅटरिना एन सकेलारोपोलू यांच्या हस्ते ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर प्रदान करण्यात आला.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी