'नरेंद्र मोदी खूप चांगले काम करत आहेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोदींचे कौतुक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 14:00 IST
1 / 6 अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मैत्रीची सर्वत्र चर्चा असते. आता डोनाल्ड ट्रम्प पदावर नाहीत, पण ते मोदींसोबतची मैत्री विसरले नाहीत. आता एका मुलाखतीदरम्यान त्यांनी नरेंद्र मोदींची कौतुक केले. न्यूयॉर्कजवळील बेडमिस्टर येथील गोल्फ क्लबमध्ये एका वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ट्रम्प बोलत होते. 2 / 6 ते म्हणाले की, 'पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी खूप चांगले काम करत आहेत.' यासोबतच त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष असतानाच्या दिवसांची आठवणही करून दिली. ते म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष असताना माझी भारतासोबत जसी मैत्री होती, तशी ओबामा किंवा जो बायडन यांचे नाही. यावेळी त्यांनी पुढील निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले. 3 / 6 राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवारीबाबत ट्रम्प म्हणाले, 'प्रत्येकाची इच्छा आहे की मी निवडणूक लढवावी. मी पोल्समध्ये आघाडीवर आहे. मी निश्चितपणे सांगू शकत नाही पण लवकरच मी याबाबत निर्णय घेऊ शकेन.'4 / 6 ट्रम्प म्हणाले, 'तुम्हाला पंतप्रधान मोदींना विचारावे लागेल, परंतु मला वाटते की, भारताला माझ्यासारखा चांगला मित्र मिळू शकत नाही.' यावेळी त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावला. 5 / 6 मुलाखतीत त्यांनी अमेरिकन भारतीयांकडून मिळालेला उत्तम प्रतिसाद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या कार्यक्रमाचीही आठवण केली. ते पुढे म्हणाले, 'माझे भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत. आम्ही खूप चांगले मित्र आहोत.'6 / 6 'मला वाटते की, नरेंद्र खूप चांगला माणूस आहे आणि खूप चांगले काम करत आहे. त्यांना मिळालेल्या जबाबदाऱ्या सोप्या नाहीत, पण मोदी त्या अतिशय जबाबदारीने पार पाडत आहेत.'