By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 17:03 IST
1 / 10पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा सध्या जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. व्हाईट हाऊसमध्ये नरेंद्र मोदींचं राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जोरदार स्वागत केलं. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषदही घेतली. 2 / 10पत्रकार परिषदेपूर्वी अमेरिका आणि भारत यांच्यात अनेक महत्त्वाच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यामध्ये, संरक्षणविषयक करार महत्त्वाचे मानले जातात. 3 / 10अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी स्टेट डिनरसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निमंत्रित केलं होतं. त्यानुसार, व्हाईट हाऊसमध्ये स्टेट डिनर पार्टीही झाली. 4 / 10पंतप्रधान नरेंद्र मोदींसह या स्टेट डिनरसाठी देशातील दिग्गजांनी हजेरी लावली असून उद्योगपती मुकेश अंबानी हे आपल्या पत्नी निता अंबानी यांच्यासह या डिनर पार्टीसाठी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले आहेत. 5 / 10व्हाईट हाऊसच्या साऊथ लॉनमध्ये स्टेट डिनरसाठी जवळपास ४०० पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या लॉनला भारतीय थीमने सजवण्यात आले होते. 6 / 10अंबानी यांच्यासह व्हाईट हाऊसमधील या स्टेट डिनर पार्टीसाठी पेप्सिको कंपनीची सीईओ इंदिरा नुई यांचाही समावेश आहे. 7 / 10महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा हेही अमेरिकेत या स्टेट डिनर पार्टीला उपस्थित होते. 8 / 10दिग्गज स्टॉक ब्रोकिंग कंपनी Zerodha चे संस्थापक निखील कामथ हेही निमंत्रण पाहुण्याच्या यादीत होते. त्यांनीही पार्टीला हजेरी लावली होती. 9 / 10जगप्रसिद्ध कंपनी गुगलचे सीईओ सुंदर पिचई हेही पत्नी अंजलीसह व्हाईट हाऊसमधील मोदींसमवेतच्या पार्टीला उपस्थित होते. 10 / 10एडोबचे सीईओ शंतणु नारायण, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नंडेला हेही कार्पोरेट विश्वातील दिग्गज म्हणून या डिनर पार्टीत सहभागी झाले होते.