शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus: ...अन् त्या एका अफेवेमुळे लोकांनी पेटवले मोबाईल टॉवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 3:21 PM

1 / 12
चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनानं युरोप आणि अमेरिकेत अक्षरश: थैमान घातलं आहे.
2 / 12
जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ११ लाखांहून अधिक आहे. ५९ हजारपेक्षा अधिक जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे.
3 / 12
ब्रिटनमध्येही कोरोनाची दहशत पाहायला मिळते आहे. ब्रिटनमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३८ हजारांपेक्षा जास्त आहे.
4 / 12
ब्रिटनमध्ये साडे तीन हजारांपेक्षा अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चिंताजनक बाब म्हणजे ब्रिटनमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनादेखील आता कोरोनाची लागण होऊ लागली आहे.
5 / 12
त्यातच आता एका अफवेमुळे ब्रिटनमध्ये अडचणी आणखी वाढल्या आहेत. गेल्या काही तासांमध्ये ब्रिटनमधील काही शहरांमध्ये मोबाईल टॉवर पेटल्याच्या घटना घडल्या आहेत.
6 / 12
५ जी मोबाईल टॉवरमुळे कोरोना पसरत असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोबाईल टॉवर पेटल्याच्या घटना घडल्या.
7 / 12
बर्मिंगहॅममधील मोबाईल टॉवर पेटवून दिल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
8 / 12
अनेकांना त्यांच्या घराच्या परिसरात ५ जी मोबाईल टॉवर नको आहे. त्यामुळे कोणीतरी मोबाईल टॉवर पेटवला असल्यास मला त्याबद्दल जराही आश्चर्य वाटणार नाही, अशी माहिती बर्मिंगहॅममध्ये मोबाईल टॉवरजवळ राहणाऱ्या एकानं 'द इंडिपेंडंट'ला दिली.
9 / 12
यानंतर मोबाईल युके संस्थेनं ५ जी मोबाईल टॉवरमुळे कोरोना पसरत असल्याचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं स्पष्ट केलं. मोबाईल युके संस्थेत थ्री, ओटू, ईई आणि व्होडाफोनचा समावेश आहे.
10 / 12
५ जीच्या मोबाईल टॉवरमुळे फुफ्फुसातील ऑक्सिजन खेचला जातो. त्यामुळे फुफ्फुसावर विपरित परिणाम होतो. माणसाची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते, असे दावे सोशल मीडियावर केले जात आहेत.
11 / 12
वुहानमधून ५ जी सेवा सुरू झाली. तिथेच सर्वप्रथम कोरोनाचा विषाणू आढळून आला, असा दावा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये करण्यात येत आहे.
12 / 12
मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला असून ही केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या