By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 14:27 IST
1 / 5जगभरात असे अनेक जीव-जंतू असतात जे इतके विषारी असतात की, ते तुमचा जीवही घेऊ शकतात.2 / 5अशा प्रकारच्या विषारी जीवांमध्ये एका माशाचा समावेश आहे. स्टोन फिश असं या माशाचं नाव असून हा एक समुद्री मासा आहे. 3 / 5स्टोन फिश दगडासारखी दिसते त्यामुळेच तिला स्टोन फिश म्हटलं जातं. आणि याच कारणामुळे अनेकजण या माशाला ओळखू शकत नाही आणि याचे शिकार होतात. 4 / 5जर चुकूनही या माशावर कुणाचा पाय पडला तर जेवढं वजन त्याच्यावर पडलंय तेवढ्याच प्रमाणात हा मासा विष सोडतो.5 / 5हे विष इतकं घातक असतं की, जर कुणी या माशावर पाय दिला तर त्या व्यक्तीचा पाय कापावाच लागेल. थोडं जरी दुर्लक्ष केलं गेलं तर जीवही जाऊ शकतो.