धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 14:53 IST
1 / 10एकेकाळी ते वन्यजीव अभयारण्याची शान होते, त्यांना पाहण्यासाठी लोक लांबून येऊन रांगेत उभे राहायचे. मात्र आता त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सात सिंहांना मारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही सांगत एक फर्मान जारी करण्यात आलं आहे. पण का?2 / 10हा प्रकार उत्तर न्यूझीलंडच्या वांगारेई शहरातील कामो वन्यजीव अभयारण्यातील आहे. या वन्यजीव अभयारण्यात असलेल्या सात सिंहांना मारण्यास आम्ही मजबूर आहोत असं इथल्या प्रशासनाने सांगितले आहे. यामागचं कारण आहे ते म्हणजे वृद्धापकाळ3 / 10हो, आपण अनेकदा ऐकलं आहे आणि पाहिलं आहे की, काही मुलं वृद्ध आई वडिलांना वाऱ्यावर सोडून देतात. आता वन्य प्राण्यांसाठीही वृद्धापकाळ ही एक कठोर शिक्षा बनली आहे. हे सिंह त्यांच्या आयुष्यापेक्षा जास्त काळ जगले आहेत आणि आता त्यांना खायला देण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. म्हणून त्यांना मारण्याशिवाय पर्याय नाही असं प्रशासनाने म्हटलं.4 / 10या वन्यजीव अभयारण्याने जारी केलेल्या निवेदनानुसार, या सिंहांचे १८ ते २१ वर्षांच्या दरम्यान आहेत. जंगलात राहणारे सिंह सहसा इतके दिवस जगत नाहीत. आता या वृद्ध सिंहांना मारण्याच्या निर्णयाने आम्ही सर्वजण दुःखी आहोत, पण हा एकमेव पर्याय आहे असं त्यांनी सांगितले.5 / 10तसेच या सिंहांना दुसऱ्या प्राणीसंग्रहालयात हलवण्यात काही अर्थ नाही, कारण त्यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य जगले आहे. त्यांच्या आठवणी आपल्या हृदयात नेहमीच ताज्या राहतील असं वन्यजीव अभयारण्याने म्हटलं आहे.6 / 10सिंहांची काळजी घेणे खूप महागडे आहे असेही उद्यानाने सांगितले आहे. त्यांच्यासाठी जंगलासारखे वातावरण निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असते. अन्न, पूरक आहार, कर्मचारी, मैदान आणि डॉक्टर हे सर्व खर्च खूप मोठे आहेत. 7 / 10उद्यानाने जनतेला ज्या प्राण्यांची गरज नाही असे प्राणी सिंहासाठी दान करण्याचं आवाहन केले होते. त्यांना दर आठवड्याला अंदाजे तीन मोठ्या प्राण्यांचे मांस आवश्यक असते असंही सिंहांचा सांभाळ करणाऱ्यांनी सांगितले.8 / 10२००० च्या दशकात या अभयारण्याला बरीच लोकप्रियता मिळाली. सेलिब्रिटी बिग कॅट हँडलर क्रेग 'द लायन मॅन' बुश यांनी त्यांच्या टीव्ही शोमध्ये हे अभयारण्य दाखवले. त्यानंतर बुशवर यांच्यावर वन्य प्राण्यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला.9 / 10२००९ मध्ये एका पांढऱ्या वाघाने त्याच्या रक्षकाला मारले. या घटनेनंतर सरकारने अभयारण्य तात्पुरते बंद केले, परंतु नंतर ते पुन्हा सुरू करण्यात आले. या अभयारण्यात १२ सिंह आणि एक बंगाल टायगर आहे. 10 / 10हे प्राणी ६ महिने ते ३ वर्षांचे असताना न्यूझीलंडमध्ये आणण्यात आले होते. २००० च्या दशकात सिंह, वाघ, बिबट्या आणि चित्ते यासह ३३ हून अधिक मोठ्या मांजरी होत्या.