आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 08:58 IST
1 / 10एपस्टीन प्रकरण हे केवळ एका व्यक्तीचा गुन्हा नाही तर त्यातून पैसा आणि पॉवर कशाप्रकारे सिस्टमला कमकुवत करू शकते याचे मोठे उदाहरण आहे. पीडित मुलींची लढाई, न्याय मागण्यासाठी धडपड आणि पारदर्शक चौकशी यावरून आज जगात या प्रकरणाची चर्चा होत आहे. 2 / 10अमेरिकन संसदेत आज एपस्टीन प्रकरणातील फाईल्स सार्वजनिक होणार आहे. अवघ्या जगाचे त्याकडे लक्ष लागले आहे. याआधी जारी झालेल्या फोटोत राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, बिल क्लिंटन आणि ब्रिटनचे प्रिंस एंड्रयू दिसत आहेत. जसजशा या नवीन फाईल्स उघडतील तसं आणखी मोठी नावे उघड होतील बोललं जाते. 3 / 10कोण आहे जेफ्री एपस्टीन? - एपस्टीन हा अमेरिकेतील एक कोट्याधीश गुंतवणूकदार होता जो न्यूयॉर्कमध्ये राहायचा. त्याच्याकडे अपार धन संपत्ती होती, जगातील अनेक बडे नेते, उद्योगपती, सेलिब्रिटी यांच्यासोबत त्याची घनिष्ट मैत्री होती. 4 / 10२००५ साली एपस्टीनवर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप लागला होता. २००८ मध्ये अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली त्याला दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर त्याला अवघ्या १३ महिन्यांसाठी जेलला पाठवले होते.5 / 10त्यानंतर २०१९ साली एपस्टीनला पुन्हा अल्पवयीन मुलींच्या मानवी तस्कराच्या गंभीर आरोपात अटक केली परंतु हा खटला सुरू होण्यापूर्वीच न्यूयॉर्कच्या जेलमध्ये त्याचा रहस्यमय मृत्यू झाला. त्याने आत्महत्या केली असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.6 / 10एपस्टीनचा दीर्घकाळ साथीदार राहिलेली घिसलेन मॅक्सवेल हिलाही २०२१ साली या गुन्ह्यात एपस्टीनला साथ दिल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर कोर्टाने २० वर्षाच्या कैदेची शिक्षा सुनावली. मॅक्सवेल सध्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.7 / 10अमेरिकन हाऊस ऑफ रिप्रेजेंटेटिव्सच्या डेमोक्रेट्सने दोषी लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनच्या कागदपत्रातील ६८ नवीन फोटो गुरुवारी सार्वजनिक केले. हे फोटो जारी करण्यामागचा हेतू एपस्टीनचे किती प्रभावशाली व्यक्तींसोबत संबंध होते हे उघड करणे आहे.8 / 10अलीकडेच राष्ट्रपती ट्रम्प यांनी एका विधेयकावर स्वाक्षरी केली आहे ज्यामध्ये न्याय विभागाला एपस्टीन आणि घिसलेन मॅक्सवेल प्रकरणांशी संबंधित फाईली शुक्रवारपर्यंत जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.9 / 10जारी केलेल्या फोटोंमध्ये अनेक खळबळजनक फोटो आहेत. त्यातील काही फोटोंमध्ये व्लादिमीर नाबोकोव्ह यांच्या 'लोलिटा' या कादंबरीतील ओळी एका महिलेच्या शरीराच्या विविध भागांवर लिहिलेल्या दिसतात. बॅकग्राऊंडला 'लोलिटा' हे पुस्तक ठेवल्याचे दिसते. 10 / 10एपस्टीन आणि अज्ञात व्यक्तींमधील सोशल मीडियावरील संवादाचे स्क्रीनशॉट देखील फिरत आहेत. या मेसेजमध्ये मुली पाठवणे आणि १ हजार डॉलर प्रति मुलगी अशी किंमत असल्याचं म्हटले आहे. ज्यात रशियातील एक १८ वर्षीय मुलीची ओळख सांगण्यात आली आहे.