शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shinzo Abe: भाषण देता देता शिंजो आबे खाली कोसळले; मागे फक्त धूर दिसला, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2022 3:12 PM

1 / 7
जपानचे माजी पंतप्रधान आणि भारताचे मित्र शिंजो आबे यांचे आज निधन झाले. त्यांची मेरीटाइम सेल्फ डिफेंस फोर्ससाठी एकेकाळी काम करणाऱ्या जवानाने हत्या केली.
2 / 7
शिंजो आबे नारा शहरात भाषण देत होते. यावेळी हल्लेखोराने त्यांच्यावर पाठीमागून दोन गोळ्या झाडल्या. गोळ्या लागताच शिंजो आबे धाडकन खाली कोसळले. कोणाला काही कळायच्या आत आवाज आणि त्यांच्या मागे धूर दिसत होता.
3 / 7
शिंजो आबे यांना यानंतर हृदयविकाराच झटका देखील आल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक अधिकाऱ्यांना आबे यांना तातडीने विमानाने एका हॉस्पिटलमध्ये हलविले. यावेळी त्यांचा श्वासोश्वास सुरु नव्हता, तसेच हृदयाची धडधडही थांबली होती.
4 / 7
आबे यांना गोळी मारल्यानंतर ह्ल्लेखोराने तेथून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे उपस्थित सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेतले.
5 / 7
आबे यांनी २०२० मध्ये पंतप्रधान पद सोडले होते. ते गेल्या काही काळापासून आजारी होते. जपानचे ते सर्वाधिक काळ असलेले पंतप्रधान होते.
6 / 7
आबे यांच्यावर हल्ला करणारा तेत्सुया यामागामी याला अटक करण्याता आली असून तो आबे यांच्यावर नाराज होता., असे चौकशीतून समोर आले आहे. तसेच घटनास्थळावरून एक हँडमेड गन ताब्यात घेण्यात आली आहे.
7 / 7
जपानमध्ये निवडणुका होणार आहेत. यामध्ये ते संभाव्य उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. लिबरल डेमोक्रेटिक पार्टीनुसार गुरुवारी रात्री हा कार्यक्रम ठरला होता. त्यानंतर त्य़ाची माहिती कार्यकर्त्यांना देण्यात आली होती.
टॅग्स :JapanजपानShinzo Abeशिन्जो आबे