Japan Earthquake: धावती बुलेट ट्रेन रुळांवरून घसरली, २० लाख घरांमध्ये काळोख; जपानला भूकंपाचे धक्के, पाहा Photo
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 09:10 IST
1 / 8Japan Earthquake: जपानची राजधानी टोक्योजवळ बुधवारी रात्री झालेल्या भूकंपामुळे मोठा हाहाकार उडाला आहे. भूकंपामुळे २ जणांचा मृत्यू झाला, तर ८८ जण जखमी झाले. दरम्यान, या ठिकाणी धावती बुलेट ट्रेन रुळावरून घसरल्यानं भूकंपाची तीव्रता किती आहे, याचा अंदाज येतो. 2 / 8भूकंपानंतर जपानच्या हवामान खात्यानं त्सुनामीचा इशारा दिला आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.३ इतकी होती. रात्री ८.०६ च्या सुमारास (जपानमध्ये ११.३०) आलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू टोक्योच्या वायव्येस २९७ किमी अंतरावर असल्याचं सांगण्यात आलंय.3 / 8जपानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्रापासून ६० किमी खोलावर होता. जपानमधील मियागी आणि फुकुशिमा प्रांतात भूकंपाचे सर्वाधिक धक्के जाणवले. 4 / 8दोन्ही प्रांतांमध्ये लोकांना किनारी भागापासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. फुकुशिमामध्ये भूकंपामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटनाही घडली.5 / 8जापानमध्ये आलेल्या भूकंपामुळे धावती बुलेट ट्रेन रुळांवरून घसरली. जपानच्या बुलेट ट्रेन ऑपरेटर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, तोहोकू येथे बुलेट ट्रेन रुळावरून घसरली. त्यावेळी ट्रेनमध्ये १०० प्रवासी होते. परंतु यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. 6 / 8जपानच्या ईस्ट निप्पॉन कंपनीच्या म्हणण्यानुसार, अनेक एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. यामध्ये ओसाकीमधील तोहोकू एक्स्प्रेसवे, मियागी प्रांतातील जबान एक्स्प्रेसवे आणि सोमा, फुकुशिमा यांचा समावेश आहे.7 / 8भूकंपानंतर उत्तर जापानच्या एका मॉलमध्येही मोठं नुकसान झालं आहे. तसंच यानंतर टोक्योमध्ये इलेक्ट्रीसिटी गेल्यानं २० लाख घरांमध्ये अंधार पसरलाय. या घटनेमुळे जपानच्या लोकांना २०११ च्या घटनेची आठवण झाली.8 / 8भूकंपाचा सर्वाधिक प्रभाव फुकुशिमामध्ये दिसून आला. या ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या घरातील सामानही खाली पडलं.