चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 11:32 IST
1 / 10रशिया युक्रेन यांच्या युद्धाचा विस्तार होण्याची चर्चा सुरू असतानाच रशिया आणि बेलारूसने जापाद २०२५ नावाने आण्विक युद्ध अभ्यास सुरू केला आहे. ज्यात भारतीय सैन्यही सहभागी होणार आहे. दर २ वर्षांनी या युद्ध सरावाचे नियोजन केले जाते. परंतु यंदाच्या युद्ध अभ्यासाचे अनेक अर्थ आहेत. 2 / 10युक्रेन युद्ध आणि नाटो देशांच्या जवळ असल्याने या युद्ध अभ्यासाकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे. जापादचा रशियन भाषेत अर्थ पश्चिम असा होतो, म्हणजे युद्ध अभ्यासाच्या माध्यमातून रशिया आणि बेलारूस पश्चिमी देशांना एक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत.3 / 10जापाद २०२५ युद्ध अभ्यास यासाठीही महत्त्वाचा मानला जात आहे कारण त्यात उघडपणे न्यूक्लिअर प्लॅनिंगचाही समावेश आहे. बेलारूसचे संरक्षण मंत्री विक्टर ख्रेनिन यांनीही याची पुष्टी करत या अभ्यासत रशियाच्या ओरेश्निक मिसाइल सिस्टमच्या माध्यमातून आण्वित्र शस्त्रे तैनात करण्याची टेस्टिंग होणार असल्याचं सांगितले आहे.4 / 10भलेही या युद्ध अभ्यासात खरोखरचे आण्विक शस्त्रे नसली तरीही रशिया आणि बेलारूस यातून जो संदेश देऊ इच्छितात तो पाश्चात्य देशांना चांगलाच ठाऊक आहे. मॉस्को आणि मिन्स्क मिळून नाटो देशांवर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पोलंड, बाल्टिक देशांसारखे इतर नाटो सदस्य याला युद्धा पूर्वीचा सराव मानत आहेत.5 / 10जापाद २०२५ युद्ध अभ्यास १२ ते १६ सप्टेंबर या कालावधीत सुरुवातीच्या टप्प्यात असेल, परंतु सैनिक अनेक आठवडे आधीच तैनात करण्यात आले आहेत. रशियन तुकड्या ऑगस्टच्या मध्यापासून बेलारूसला पोहचल्या आहेत. ज्यातून रशियाचा हेतू स्पष्टपणे दिसून येतो. 6 / 10या युद्ध सरावात जवळपास १३ हजार जवान सहभागी होणार असल्याचं समोर आले आहे. परंतु ही संख्या याहून अधिक असल्याचेही बोलले जाते. मागील जापाद अभ्यासात घोषित केलेल्या संख्येपेक्षा जास्त सैनिक, टँक, विमान आणि मिसाइल प्रणालीचा वापर करण्यात आला होता. 7 / 10विशेष म्हणजे यंदाच्या युद्ध अभ्यासात भारतानेही सहभाग घेतला आहे. भारतीय सैन्याचे ७० जवान यात असतील, त्यात ५७ लष्कराचे, ७ वायूसेनेचे आणि १ नौदल जवानाचा सहभाग आहे. यात कुमाऊ रेजिमेंटच्या जवानांची मुख्य भूमिका आहे. या युद्ध अभ्यासावेळी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे सैन्य एकाच व्यासपीठावर परंतु वेगवेगळ्या गटात सहभागी असतील. ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान एकाच युद्ध अभ्यासात सहभागी झाले आहेत. 8 / 10या व्यतिरिक्त या युद्ध अभ्यासात आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिकेसह अनेक देश कुठल्या ना कुठल्या प्रकारे यात सहभागी झालेत. युद्ध अभ्यासात बेलारूस, बांगलादेश, बुर्किनो फासो, कांगो, माली, भारत, इराण, ताजिकिस्तान यांचा समावेश आहे. ऑब्जर्वर देशात कंबोडिया, चीन, क्यूबा, कजाकिस्तान, मंगोलिया, म्यानमार, उत्तर कोरिया, पाकिस्तान, सर्बिया, थायलँड, संयुक्त अरब अमीरात आणि उज्बेकिस्तान या देशांचा समावेश आहे.9 / 10जापाद २०२५ हा केवळ युद्ध अभ्यास आणि शक्तीप्रदर्शन आहे की, रशियाचा वेगळाच हेतू आहे असा प्रश्न नाटो देशांना पडला आहे. या युद्ध अभ्यासामुळे युरोपीय देशांची चिंता वाढली आहे. विशेषत: सुवाल्की कॉरिडोर क्षेत्र, जे पोलंड आणि लिथुआनिया यांच्यातील भाग आहे. जो नाटो देशांसाठी संवेदनशील हिस्सा आहे. जर हा भाग हातातून गेला तर बाल्टिक देशांसोबत नाटो देशांचा संपर्क तुटेल. 10 / 10त्यामुळेच नाटो देशांनीही गप्प न राहता लिथुआनिया, पोलंड आणि उत्तर युरोपीय देशांनी आपापल्या सैन्याचा अभ्यास सुरू केला आहे. ज्यात लाखो सैनिक सहभागी आहेत. त्यामुळे या संपूर्ण भागात नाटो आणि रशियन समर्थित सैन्य आमनेसामने अभ्यास करत आहेत. त्यामुळे युरोपातील तणाव वाढलेला आहे.