जगभरात खळबळ उडाली! एकाच रुग्णामध्ये दोन प्रकारचे कोरोना स्ट्रेन; शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 11:46 IST
1 / 10आधीच कोरोनाच्या नवीन स्ट्रेनने जगभरात धास्ती पसरवली असताना आता आणखी एक खळबळजनक वृत्त हाती आले आहे. जगातील पहिल्याच डबल इन्फेक्शनचा प्रकार समोर आला आहे. 2 / 10ब्राझिलच्या रुग्णांच्या तपासणीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन कोरोनाग्रस्तांमध्ये एकाचवेळी दोन वेगवेगळ्या प्रमारचे कोरोना व्हायरस आढळून आले आहेत. या रुग्णांना दोन्ही कोरोना व्हायरसचे एकाचवेळी संक्रमन झाले आहे. 3 / 10ब्राझिलच्या Feevale University विद्यापीठाच्या संशोधकांनी 90 कोरोग्रस्तांच्या सॅम्पलचा अभ्यास केला. यामध्ये हा अजब प्रकार समजला आहे. 4 / 10डेली मेलने याबाबतचे वृत्त दिले आहे. या दोन्ही रुग्णांचे स्वॅब हे ब्राझिलच्या रिओ ग्रांडे डो सुल शहरातून घेण्यात आले होते. या कोरोना स्ट्रेनना P.1 आणि P.2 असे नाव देण्यात आले आहे. 5 / 10यापैकी P.1 व्हेरिअंट खूपच घातक असल्याचे म्हटले आहे. कारण पी 2 वर कोरोना लसीचा प्रभाव होण्याची शक्यता आहे. मात्र, पी1 व्हेरिअंटवर कोरोना लसीचा परिणाम कमी प्रमाणात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 6 / 10दुसऱ्या रुग्णामध्ये पी 2 आणि B.1.91 असे कोरोनाचे दोन प्रकार सापडले आहेत. B.1.91 व्हेरिअंट पहिल्यांदा स्वीडनमध्ये सापडला होता. ब्राझिलच्या या दाव्यावर अद्याप सर्वोच्च संस्थांनी उत्तर दिलेले नसले तरीह तज्ज्ञांनुसार एकाचवेळी दोन प्रकारच्या कोरोनाचे संक्रमन होणे शक्य आहे. 7 / 10लंडनचे फ्रांसिस क्रिक इंस्टीट्य़ूटचे वर्ल्डवाइड इंफ्लूएंझा सेंटरचे संचालक डॉ. जॉन मॅक्युले यांनी यावर मत व्यक्त केले आहे. एकाचवेळी रुग्णाला दोन कोरोना स्ट्रेनची लागण होऊ शकते. असे फ्लू सोबतही होते. तसेच दोन्ही कोरोना स्ट्रेन एकमेकांसोबत लढून त्यांचा जेनेटीक कोड बदलू शकतात, असा इशारा दिला आहे. 8 / 10ब्राझिलच्या या संशोधनाचा अहवाल अद्य़ाप कुठे छापून आलेला नाही. तसेच कोणत्याही संशोधकांनी यावर अभ्यास केलेला नाही. मात्र, प्रमुख रिसर्चर फर्नान्डो स्पिलकी यांनी सांगितले की, कोरोनाचे को इन्फेक्शन नवीन कोरोना व्हेरिअंटला जन्म देऊ शकते, जो खूप घातक होऊ शकतो. 9 / 10या संशोधनावर काही संशोधकांनी संशयही व्यक्त केला आहे. कोरोना सॅम्पलिंगवेळी दोन सॅम्पल एकमेकांत मिसळले असतील किंवा काही कारणाने चुकीचा रिझल्ट आला असेल, असे एका ज्येष्ठ संशोधकाने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले आहे. 10 / 10ब्राझिल सध्या कोरोनाच्या दुसऱ्य़ा लाटेमध्ये आहे. दररोज तिथे कोरोनामुळे कमीतकमी 1000 लोकांचा मृत्यू होत आहे. यामुळे हे संशोधन खरे निघाले तर कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.