'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 18:31 IST
1 / 10या आहेत कॅरोलिन लेविट! अमेरिकेच्या अध्यक्षांचं कार्यालय आणि निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसच्या त्या प्रेस सेक्रेटरी आहेत. दररोज पत्रकार परिषद घेऊन त्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयांची माहिती देतात. जगभरातील घडामोडींवर ट्रम्प सरकारची भूमिका मांडतात.2 / 10तर झालं असं की, २७ वर्षांच्या कॅरोलिन लेविट यांचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कौतुक केले. पण कौतुक करताना त्यांनी जे शब्द वापरले, त्यावरून ट्रम्प यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला. 3 / 10त्यांच्या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढण्यास सुरूवात झाली. हे प्रकरणं पार नव्वदच्या दशकात राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या बिल क्लिंटन यांच्यापर्यंत पोहोचलं. मोनिका लेविन्स्की आणि क्लिंटन प्रकरण प्रचंड गाजलं होतं.4 / 10आधी डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांचे कौतुक करताना काय बोलून गेले, ते वाचा. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रेस सेक्रेटरीबद्दल विचारलं गेलं. त्यावेळी त्यांनी कामाचं कौतुक करताना काही असे शब्द वापरले ज्यामुळे अर्थच बदलून गेला.5 / 10ट्रम्प म्हणाले, 'तो असा चेहरा आहे, बुद्धी आहे, तिचे ओठ... तिच्या ओठांच्या हालचाली... असे हलतात जणू मशीनगच आहे. ती एक स्टार आहे. खरं सांगायचं ती खूप चांगली व्यक्ती आहे.'6 / 10'मला नाही वाटत की, कॅरोलिनपेक्षा चांगली प्रेस सेक्रेटरी कधी व्हाईट हाऊसची राहिली असेल. ती खूपच चांगली आहे', असे डोनाल्ड ट्रम्प बोलून गेले.7 / 10डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविटचं कौतुक करताना तिच्या ओठांबद्दल, तिच्या सौंदर्याबद्दल बोलले. त्यावरूनच सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. काहींनी कॅरोलिन लेविटच्या कामाचं कौतुक केलं. तर काही ट्रम्प यांच्यावर टीका करत आहेत.8 / 10हा म्हातारा विचित्र माणूस आहे. आपण काय बोललो आहोत, हेही त्याला कळलं नाही, असे एकाने म्हटले आहेत. दुसऱ्या एका व्यक्तीने म्हटलंय, तरीही लोकांना संशय आहे की ते एपस्टाईन फाईल्समध्ये आहेत का? 9 / 10एका व्यक्तीने मोनिक लेविन्स्की प्रकरणाचा उल्लेख केला आहे. मोठे मोनिका लेविन्स्की प्रकरणाचे संशय येतोय.10 / 10१९९५ ते १९९७ च्या काळात मोनिका लेविन्स्की व्हाईट हाऊसमध्ये इंटर्न म्हणून नोकरी करत होती. त्या काळात राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी नऊ वेळा व्हाईट हाऊसमध्ये आपल्यासोबत संबंध ठेवल्याचे तिने म्हटले होते.